पिंपरी-चिंचवड

तळेगाव-कातवी रस्त्याची दुरवस्था

CD

तळेगाव दाभाडे, ता. २ : तळेगाव स्टेशन परिसरातील यशवंतनगर ते कातवी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. खोल खड्डे, तीव्र उतार यामुळे या मार्गावर वाहनचालकांची तारांबर उडत आहे. पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांसह महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
यशवंतनगरच्या पुढे कातवी पुलापर्यंत रस्त्याची परिस्थिती बिकट आहे. या मार्गावर पथदिवे नसल्याने चालणेदेखील धोक्याचे झाले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना वेळी अक्षरशः जीव मुठीत धरून या मार्गावर प्रवास करतात. खड्ड्यांमुळे वाहनधारकांना दुखापती वाढल्याच्या तक्रारी येत आहेत.
या रस्त्यावर रात्रंदिवस नागरिक, विद्यार्थी आणि कामगार वर्गाची सतत ये-जा सुरू असते. पण, त्यांना खड्डे चुकवत प्रवास करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती करून पथदिवे बसवावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस यांनी केली आहे.

NE25V64352

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik News: रुग्णालयातूनच रणनिती आखली, आजारी असूनही राजकारणावर पकड केली; उमेदवाराला जिंकवून भुजबळांनी ताकद दाखवली!

Red Christmas Dress for Woman: स्टाइल आणि एलिगन्सचा परफेक्ट कॉम्बो! Christmas पार्टीसाठी बेस्ट रेड आउटफिट्स

Black Coffee Benefits: ब्लॅक कॉफी हृदयासाठी फायदेशीर की धोकादायक? वाचा याचे योग्य उत्तर

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: भाजपा हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष, आम्ही जनतेचे आभार मानतो - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मामेभावाशी बळजबरीनं लग्न लावून दिलं, पुन्हा पुन्हा अत्याचार; हाजी मस्तानच्या मुलीची न्यायासाठी मोदी-शहांकडे विनवणी

SCROLL FOR NEXT