पिंपरी-चिंचवड

‘युपीआय’ तिकीटास नकार, मग, कारवाईस व्हा तयार !

CD

पिंपरी, ता. ५ ः पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) प्रवाशांच्या तिकीट वितरणासाठी ‘युपीआय स्कॅनर (ऑनलाइन) व मोबाईल ॲप्लिकेशन तिकीट वितरण प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे. मात्र, विविध कारणे सांगून वाहक ऑनलाइन पैसे स्विकारण्यास नकार देत आहेत. त्यामुळे पीएमपीएमएल प्रशासनाने वाहकांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तसेच ऑनलाइन पैसे नाकारणाऱ्या वाहकांवर आता कारवाई केली जाणार आहे.
प्रवाशांना तिकीट वितरण प्रक्रिया जलद, सुलभ व पारदर्शक व्हावी तसेच सुट्ट्या रकमेवरील वाद टाळण्यासाठी पीएमपीएमएल प्रशासनाने १ ऑक्टोबर २०२३ पासून बसमध्ये ‘युपीआय स्कॅनर’द्वारे पेमेंट सुविधा सुरू केली आहे. ऑनलाइन पैसे भरण्याची सुविधा सुरू होऊन दोन वर्षे होऊन गेले. पण, अजूनही प्रवाशांना ऑनलाइन तिकीट काढताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
बहुतांश वेळा वाहक कोणतेही प्रयत्न न करताच ऑनलाइन पैसे स्विकारण्यास नकार देत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी पीएमपीएमएलकडे केल्या होत्या. प्रशासनाने प्रवाशांची तक्रारीची दखल घेत सर्व चालक, वाहक, तिकीट तपासणीस व पर्यवेक्षकीय सेवकांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

काय आहेत समस्या ?
- नेटवर्क नसल्यामुळे वेळ संपणे, मशीन हँग होणे, वेळखाऊ प्रक्रिया
- गर्दीच्या वेळेस ऑनलाइन पैसे स्वीकारण्यास वाहकांचा नकार
- कमी किंमतीच्या तिकिटांसाठी वाहकांकडून रोख रकमेची मागणी

आर्थिक भुर्दंडाचा ताप
बऱ्याच वेळा प्रवाशांच्या खात्यातून पैसे वजा होऊनही तिकीट न आल्याने त्यांना पुन्हा रोख पैसे देऊन तिकीट काढावे लागत आहे. वाहक पुन्हा पैसे घेतल्याशिवाय तिकीट देत नाही. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. पैसे परत मिळविण्याची प्रक्रिया खूप किचकट असल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे.


ऑनलाइन पेमेंट आणि तिकीट प्रणालीसाठी वाहकांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. वाहकांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार किंवा तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.
- सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल

काय आहेत मार्गदर्शक सूचना ?
- मोबाईल ॲपद्वारे तिकीट घेणारे प्रवासी बसमध्ये बसल्यानंतर वाहकांनी त्यांना तातडीने तिकीट काढण्याची सूचना द्यावी
- वाहकांनी सीटवर बसून तिकिटे देऊ नयेत. त्यांची तिकिटे तपासावीत.
- वाहकांनी टेस्ट तिकीट, नॉट फॉर सेल तिकीट किंवा प्रिंट-एरर तिकिटांची प्रवाशांना विक्री करु नये
- ई-मशिनशी छेडछाड करणे अथवा प्रिंट-एरर तिकिटांवर हस्ताक्षर करून देण्यास सक्त मनाई
- चालक, वाहकांनी कोणत्याही परिस्थितीत युपीआय तिकीटाची रक्कम स्वतःच्या बँक खात्यावर स्वीकारू नये.
- प्रवाशांनी ऑनबोर्ड युपीआय तिकीट मागणी केल्यास त्वरित तिकीट देणे बंधनकारक
- प्रिंट-एरर तिकीटे महामंडळाने निश्चित केलेल्या प्रक्रियेनुसार संबंधित आगारात जमा करणे बंधनकारक
- वैयक्तिक रकमेची नोंद ड्युटी सुरू करण्यापूर्वी टाईम कीपरकडून वेबिलवर करावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Women’s Team Meets PM Modi : विश्व विजयानंतर 'टीम इंडिया'ने घेतली पंतप्रधान मोदींची भेट अन् झाली दिलखुलास चर्चा!

Unhealthy Ration : गोरगरिबांच्या आरोग्याशी खेळ; सुधागडात रास्तभाव दुकानातील धान्यात चक्क जिवंत अळ्या व लेंड्या!

Pune News : मुलासह दोन महिन्यांत सासरी परतण्याचे पत्नीला न्यायालयाचे आदेश; पतीचा अर्ज मंजूर

Maharashtra Politics : सोलापुर जिल्ह्यातील भाजप उमेदवाराचे एबी फॉर्म शशिकांत चव्हाण यांच्याकडे सुपूर्त!

Mohammed Shami: ३ सामन्यात १५ विकेट्स... शमीचा परफॉर्मन्स जबर, तरी संघाबाहेर! आगरकर-गंभीर वादामुळे ‘क्लीन बोल्ड’?

SCROLL FOR NEXT