पर्रीकर मार्गाच्या फलकावरील अक्षरे गळून पडली
पिंपळे गुरव येथील माजी संरक्षण मंत्री कै. मनोहर पर्रीकर (समतल विलगक) मार्गावरील अक्षरे गळून पडली आहेत. अनेकदा संबंधित अधिकाऱ्यांना कळविले पंरतु, ‘पाहणी करू’ एवढंच उत्तर अधिकारी देत आहेत. येथील अक्षरांना वेगवेगळी रंगरंगोटी करून अक्षरे विद्रूप केली आहेत. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
-एक नागरिक, नवी सांगवी
PNE25V65663
भोसरीतील विरंगुळा केंद्रातील साहित्य तुटले
भोसरी येथे धोंडीबा गणपत फुगे विरंगुळा केंद्र, दिघी रोड राधानगरी सोसायटीच्या मागे व्यायामाचे तसेच लहान मुलांच्या खेळाचे साहित्य तुटलेले आहेत. प्रशासनाने याची दखल घेऊन तत्काळ दुरुस्ती करावी.
-हरिश डोळस, भोसरी
PNE25V65665
नो पार्किंग फलकाभोवती वाहने
महापालिकेच्या ‘ब’ प्रभागात ‘नो पार्किंग’ फलका सभोवती गाड्या उभ्या केल्यामुळे महापालिकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची अडचण होत आहे. त्यामुळे वाहने अधिकृत वाहन तळावर लावण्याच्या सूचना दाव्यात. जेणेकरून इतरांची गैरसोय होणार नाही.
-रमेश देव, चिंचवड
PNE25V65661
तुटलेली चेंबरजाळी दुरुस्त करा
फुलजाई चौक, शिंदेवस्तीजवळील गणेशमंदिर परिसरात तुटलेली आणि गंजलेली चेंबरजाळी कधी बदलणार? गणपती झाले, दिवाळी संपली तरी येथील चेंबरची दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेऊन तत्काळ दुरुस्ती करावी.
-श्रीनिवास धोंगडे, रावेत.
PNE25V65660