झाडांच्या फांद्या व वायरींमुळे अपघाताचा धोका
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कवडेनगर येथील मयूरनगरी सोसायटीसमोरील झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडल्या आहेत. मागील अनेक दिवसांपासून येथील वायरिंग देखील खाली लोंबकळत आहे. त्यामुळे या परिसरात अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने या समस्येची दखल घेऊन कारवाई करावी.
- एस. बी. जाधव, कवडेनगर
PNE25V66729
पदपथावरील चेंबर खचले
चिंचवड येथे जुन्या जकात नाका परिसरातील शुभम कॉम्प्लेक्स समोरील पदपथावरील चेंबर पूर्णपणे खचले आहे. या रस्त्यावर सतत वर्दळ असते, त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. महापालिकेने दखल घेऊन योग्य ती उपाययोजना करावी.
-रमेश पाटील, चिंचवड
PNE25V66728
खोदकामाने रस्ते उखडले, दुचाकीस्वार त्रस्त
मागील काही महिने झाले यशवंतनगरमध्ये रस्त्याच्या बाजूच्या पट्ट्या खोदून ठेवलेल्या आहेत. जवळजवळ सर्वच रस्ते मधोमध आडवे खोदून ठेवलेले आहेत. कधी पाण्याच्या पाइपलाइनसाठी तर कधी विद्युत वाहिन्या टाकण्यासाठी. रस्त्यावर बारीक खडी आणि वाळूचे ढीग पडून आहेत. रात्रीच्या वेळी तर रस्त्यावरील खडी-वाळू दिसत नाही. त्यामुळे दुचाकी घसरून अपघात होत आहेत. रस्त्यावर सगळीकडे राडारोडा पसरलेला आहे. या रस्त्यांची दुरुस्ती तसेच गटारांची साफ-सफाई करून फरशा बसविण्याची काम तत्काळ पूर्ण करावे.
-प्रकाश वा. दातार, यशवंतनगर
PNE25V66726
झाडांमुळे सीसीटीव्ही अदृश्य
महापालिकेच्या स्मार्ट सिटी उपक्रमात सीसीटीव्ही कॅमेरे यंत्रणा उभारण्यात आली आहे. परंतु संभाजीनगर येथील बजाज स्कूल जवळील सीसीटीव्ही कॅमेरे झाडांमुळे अदृश्य झालेले आहेत. त्यामुळे पालिकेच्या संबंधित विभागाने याची त्वरित दखल घेऊन सीसीटीव्ही कॅमेरेत संपूर्ण परिसर दिसेल अशा पद्धतीने लावावेत.
-बी. एस. पाटील, संभाजीनगर
PNE25V66727
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.