पिंपरी, ता. १० ः पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढल्यास त्याचा विरोधकांना फायदा होतो. त्यामुळे खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने एकत्रित निवडणुका लढविण्याचा आमचा आग्रह असल्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष योगेश बहल यांनी मांडली.
पिंपरीत झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शहर कार्यकारिणीची घोषणा केली. त्या वेळी ते माध्यमांशी बोलत होते. माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, नाना काटे, भाऊसाहेब भोईर, मोरेश्वर भोंडवे, श्याम लांडे, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, युवती शहराध्यक्ष वर्षा जगताप उपस्थित होते. बहल म्हणाले, ‘‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या महायुतीत आहे. मात्र, मित्रपक्षांकडून स्वतंत्र लढण्याची भाषा सुरू आहे. त्यामुळे आमचीही स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भोसरीत लवकरच जनसंवाद कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. त्याचीही तयारी सुरू आहे. महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर इतर पक्षातील काही माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित केला जाईल.’’
अशी आहे राष्ट्रवादी कॉंग्रेसची कार्यकारिणी
योगेश बहल (अध्यक्ष); माजी आमदार विलास लांडे (मुख्य समन्वयक), अजित गव्हाणे (मुख्य प्रवक्ता); भाऊसाहेब भोईर, नाना काटे (मुख्य संघटक); प्रशांत शितोळे, मोरेश्वर भोंडवे, संतोष बारणे, श्याम लांडे, फजल शेख, उल्हास शेट्टी, राहुल भोसले, विक्रांत लांडे, तानाजी खाडे (कार्याध्यक्ष); दीपक साकोरे (खजिनदार); विधानसभा अध्यक्ष आणि संघटक प्रत्येकी तीन; एक मुख्य सरचिटणीस, एक महिला मुख्य संघटिका, नऊ विधानसभा संघटिका, सहा कार्यकारिणी सदस्य, ४३ उपाध्यक्ष, ३४ सरचिटणीस, २३ चिटणीस आणि महिला, युवक, विद्यार्थी, युवतीसह २४ विविध सेलचे प्रत्येकी एक अध्यक्ष.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.