पिंपरी-चिंचवड

वॉशिंग सेंटरचे पाणी मुंडे चौकात रस्त्यावर

CD

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १० ः गोपीनाथ मुंडे चौकालगत असलेल्या एका खाजगी वॉशिंग सेंटरवरमधील पाणी थेट निगडी-तळवडे रस्त्यावर येत आहे. त्यामुळे चौकात बरेच पाणी साचलेले असते. दुचाकी घसरून अनेकदा अपघात होतात. या वॉशिंग सेंटरला महापालिका प्रशासनाने केवळ नोटिसा बजावल्या आहेत, मात्र प्रत्यक्षात कोणतीही कारवाई होत नाही. महापालिकेने काही महिन्यांपूर्वी निगडी ते गोपीनाथ मुंडे चौकापर्यंत करोडो रुपये खर्च करून प्रशस्त पदपथ आणि सायकल ट्रॅक विकसित केला आहे. चौकात बाराही महिने पाणी असते. त्यामुळे नागरिकांना पाण्यातून रस्ता ओलांडताना तारेवरची कसरत करावी लागते. पदपथावरून जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर पाणी उडते. महापालिका प्रशासनाने हा प्रकार थांबवावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इंधन तेलाच्या दराचा भडका उडणार, USचा खार्ग बेटावर हल्ला; ९० टक्के कच्च्या तेलाची इथूनच होते निर्यात

IT Park Kolhapur : कोल्हापुरातील आयटी पार्कसाठी जमीन हस्तांतरणाचा आदेश, महानगरपालिकेची परवानगी घ्यावीच लागणार

Latest Marathi News Live Update : श्री अंबाबाई मूळ मूर्तीचे दर्शन आजपासून बंद, चार दिवस होणार गाभारा संवर्धन प्रक्रिया

एका दिवसाच्या सोबतीसाठी वाट्टेल ते! साई पल्लवीचा अमिर खानच्या लेकासोबत रोमान्स, अनोखी प्रेमकहाणी चर्चेत

Paithan News: नाथषष्ठी यात्रेत पैठणची बाजारपेठ फुलली; तीन दिवसांत २५ कोटींची उलाढाल; संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी यात्रेत भाविकांची गर्दी,

SCROLL FOR NEXT