पिंपरी-चिंचवड

वर्धापनदिन मध्यवर्ती पिंपरी चिंचवड

CD

वर्धापनदिन पुरवणी लेख
--
पुण्याच्या मध्यवर्ती
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड शहरातील चऱ्होली हे वेगाने विकसित होणारे उपनगर ठरले आहे. एक महत्त्वाचे निवासी आणि औद्योगिक केंद्र बनत आहे. उत्तम कनेक्टिव्हिटीमुळे नागरिकांनी निवासासाठी प्राधान्य दिले आहे. पुण्याच्या पश्चिमेला व दक्षिणेला डोंगर आहे. त्यामुळे पूर्वेला व उत्तरेला बांधकामे वाढत आहेत. नाशिक महामार्गावरील राजगुरुनगरच्या पुढे आणि अहिल्यानगर रस्त्यावरील शिरूरपर्यंत घरेच घरे दिसत आहेत. त्यामुळे भविष्यात पुण्याचा विस्तार उत्तरेला अधिक होऊन पिंपरी चिंचवड विशेषतः चऱ्होली परिसर मध्यवर्ती ठरणार असल्याचे दिसते.
- पीतांबर लोहार

मुं बई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-बंगळूर महामार्ग, नाशिक महामार्ग, अहिल्यानगर रस्ता, तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग आणि अंतर्गत छोट्या रस्त्यांमुळे चऱ्होली परिसराची कनेक्टिव्हिटी वाढली आहे. शिवाय, पुणे प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) नियोजित रिंगरोड, तळेगाव-चाकण-आळंदी-वाघोली-हडपसर नियोजित लोहमार्ग यामुळे कनेक्टिव्हिटीत आणखी भर पडणार आहे. गृहप्रकल्पांबरोबरच आयटी क्षेत्र विस्तारणार आहे. यामुळे रोजगाराच्या संधीही वाढणार आहेत. त्यामुळे नागरिकांचा ओढा वाढणार आहे.

उत्तम कनेक्टिव्हिटी
चऱ्होली हे राष्ट्रीय महामार्ग आणि प्रस्तावित पुणे रिंगरोडमुळे मुख्य शहरांशी जोडले आहे. औद्योगिक आणि व्यावसायिक केंद्र जवळ आहेत. तळवडे आयटी पार्क, चाकण औद्योगिक क्षेत्र आणि भोसरी एमआयडीसीमुळे अनेकांसाठी सोयीचे आहे. तीर्थक्षेत्र आळंदी जवळच आहे. शिवाय, विकासासाठी जमीन उपलब्ध आहे. त्यामुळे मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांची उभारणी सुरू आहे.

बांधकामांना वेग
पुणे हे नेहमीच आशादायक शहर राहिले आहे, जे घर खरेदीदार आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करते. त्याची सतत वाढ, विकसित होत असलेली पायाभूत सुविधा आणि विस्तारत जाणारे व्यावसायिक केंद्र यामुळे ते फायदेशीर रिअल इस्टेट संधी देत ​​आहे. अनेक उदयोन्मुख ठिकाणांपैकी, चऱ्होली पुढील मोठी रिअल इस्टेट गृहनिर्माण बाजारपेठ म्हणून वेगाने लक्ष वेधेल असा बांधकाम क्षेत्रातील अभ्यासकांचे मत आहे.

विमानतळाचे सानिध्य
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ चऱ्होलीपासून जवळ आहे. आयटी पार्क आणि औद्योगिक वसाहतींपर्यंत पोहोचण्याची चांगली सोय आहे. पुणे-नाशिक महामार्ग, आळंदी पुणे पंढरपूर पालखी मार्ग, भोसरी आणि पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्र, लोहगाव आणि दिघी आयटी झोन, विश्रांतवाडी आणि कोरेगाव पार्क हे क्षेत्र रस्त्यांनी चऱ्होलीशी जोडले गेले आहेत. विमानतळाचा वापर करणारे बरेच लोक या भागातील रस्त्यांचा वापर करू लागले आहेत.

सोयीसुविधांनी युक्त
गुंतवणूकदारांसाठी पिंपरी चिंचवड महत्त्वाचे आहे. चऱ्होली, डुडुळगाव, मोशी, चिखली या पूर्व व उत्तरेकडील उपनगरांसह पश्चिमेकडील रावेत, किवळे, मामुर्डी, पुनावळे, ताथवडे, वाकड या उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. निवासी सदनिकांसह व्यापारी इमारतींची उभारणी सुरू आहे. शिवाय, विविध सेवा सुविधांनी युक्त हे परिसर आहेत.

रोजगार केंद्र
पुणे शहरातील रोजगार क्षेत्रांशी चांगले जोडलेले असल्याने पिंपरी चिंचवड सर्वांनाच फायदेशीर आहे. खराडी, येरवडा, विमाननगर आणि हिंजवडी हे आयटी आणि औद्योगिक क्षेत्र जवळ आहेत. कारण यामुळे रहिवाशांना त्यांचे करिअर करता येते आणि इतर क्षेत्रांइतके गर्दी नसलेल्या भागात राहता येते. शिवाय, प्रशस्त रस्ते आणि शांत वातावरण यामुळे राहण्यासाठी नागरिकांची पसंती आहे.
रोजगाराच्या संधीही अधिक आहेत. आयटी आणि उत्पादन उद्योगांच्या विकासामुळे, रोजगाराच्या शोधात अनेक लोक शहरात दाखल होत आहेत.

पायाभूत सुविधा
पिंपरी चिंचवडचे आकर्षण अनेकांना आहे. घरांच्या आवाक्यातील किमती आणि उपलब्धता अधिक यामुळे अनेकांची राहण्यासाठी शहराला पसंती आहे. नवीन शॉपिंग मॉल्स, मनोरंजन सुविधा, रेस्टॉरंट्स आणि मनोरंजनाची ठिकाणे उभारली जात आहे. तीही अनेकांना आकर्षित करीत आहेत. बाजारपेठा उपलब्ध होत आहेत. यामुळे नियोजित विकासाचे आदर्श मॉडल अशी पिंपरी चिंचवडची ओळख होत आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H5N5 Virus: 'बर्ड फ्लू'च्या दुर्मिळ विषाणूचा धोका वाढला, 'इथे' झाला पहिला मृत्यू; आरोग्य विभागाकडून निवेदन

Agriculture News : द्राक्षपंढरीची व्यथा! 80% उत्पादन घट, आता निर्यातक्षम द्राक्ष तपासणीच्या 10 हजार खर्चाचा बोजा शेतकऱ्यांच्या मानगुटीवर

Latest Marathi News Live Update : पेण नगरपालिकेच्या वतीने मतदारांसाठी जनजागृती रॅली

आमदारांना ओळखलं नाही अन् उभा न राहिल्यानं डॉक्टरना, नोटीस बजावणं असंवेदनशील; हायकोर्टानं सरकारला फटकारलं

IND vs SA, 2nd Test: दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ तंबूत, भारताच्या कुलदीप यादवला ३ विकेट्स; पहिल्या दिवशी काय घडलं?

SCROLL FOR NEXT