अशोका बसस्थानक परिसर अस्वच्छ
निगडी ः निगडी प्राधिकरण सेक्टर नंबर २७/अ येथील अशोका बसस्थानकाच्या मागील बाजूस कचरा साचला आहे. ही बाब ‘स्मार्ट सिटी’ला शोभणारी नाही. नागरिकांना या अस्वच्छतेचा त्रास होत आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन या परिसराची तत्काळ स्वच्छता करावी.
-सिराज शेख, निगडी
PNE25V67558
खराब रस्त्याचे डांबरीकरण करावे
पिंपळे निलख ः जगताप डेअरी येथील हिंजवडी-भोसरी बीआरटी बस मार्गावरील कस्पटे कॉर्नर बसस्थानका बाहेरील रस्त्याचे नुकतेच डांबरीकरण झाले आहे. या अगोदर रस्त्यावरील जुने डांबर काढण्यात आले होते. या बसस्थानका बाहेरील रिलिंगला लागून अंदाजे तीन फूट रुंद एवढे डांबरीकरण न झाल्याने गावातील एक युवक दुचाकीवरून जात असताना घसरून पडल्याने दुखापत झाली. त्यामुळे महापालिकेच्या संबंधित विभागाने या समस्येची दखल घेऊन उर्वरित रस्त्याचे डांबरीकरण करावे.
-सनी शिंदे, पिंपळे निलख.
PNE25V67560
पदपथाची दुरुस्ती व स्वच्छता करावी
चिंचवड ः चापेकर चौकातील पदपथावर राडारोडा, टाकाऊ आणि भंगार साहित्य साचलेले आहे. तसेच पदपथावर खड्डे आणि फरशा तुटल्या आहेत. मंडई, पोलिस ठाणे, दवाखाने, बस स्थानक असलेल्या परिसरातील या पदपथाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना चालण्यास पदपथ उपलब्ध नाहीत. वारंवार तक्रार करून देखील महापालिका पदपथाची दुरुस्ती आणि स्वच्छता करत नाही.
-दिलीप पारधे, चिंचवड
PNE25V67561
पोस्टल कॉलनी परिसर अस्वच्छ
वाकड ः येथील दत्त मंदिर रस्त्यावर पोस्टल कॉलनी परिसरात अनेक महिन्यांपासून दुभाजके, राडारोडा आणि कचरा साचून आहे. त्यामुळे वाहतुकीस अडचण निर्माण होत आहेत. याठिकाणी कोणतेही विकास काम चालू नाही. महापालिकेस वारंवार कळवून देखील याची दखल घेतली जात नाही. महापालिकेने रस्त्यावरील टाकाऊ साहित्य, राडारोडा हटवून रस्ता स्वच्छ करावा.
-संदीप जाधव, वाकड
PNE25V67559
घरकुल-पिंपरीगाव मार्गावर मोठ्या बसची मागणी
चिखली ः घरकुल ते पिंपरीगाव बस क्रमांक ३३४ ही पिंपरीगाव येथून निघून घरकुल वसाहत (चिखली) येथे थांबते. या मार्गावर अनेक थांबे आहेत. हा मार्ग पिंपरीगाव ते घरकुल वसाहत असा आहे आणि दोन्ही दिशांना सेवा देतो. परंतु आता या मार्गावर मिडी बस सोडण्यात आली आहे. प्रवासी जास्त असल्याने बस कमी पडत आहे. त्यामुळे प्रशासनाने या मार्गावर मोठी बस सुरू करावी.
-रवींद्र शिरसाळकर, घरकुल (चिखली)
PNE25V67569