पिंपरी-चिंचवड

वर्धापनदिन पर्यावरण घोडके

CD

स्वच्छ शहरासाठी
एक पाऊल उचलूया !

स्वच्छ शहर हे आनंदी शहराचा आरसा असतो. जे शहर स्वच्छ, पर्यावरणपूरक राहण्यायोग्य असते, तेथील नागरिक आनंदी असतात. त्यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला गेला पाहिजे. सुरुवात स्वतःपासूनच असली पाहिजे.
- सिकंदर घोडके, पर्यावरणप्रेमी

के स धुण्यासाठी वापरलेल्या शाम्पूचा पाऊच आणि तुटलेली चप्पल यापासून पर्यावरण संवर्धनाची सुरुवात झाली पाहिजे. सहज वापरून फेकून देण्यात येणाऱ्या वस्तू कोठेही न फेकता वर्गीकरण करूनच स्वच्छता व्यवस्थेकडे दिल्या पाहिजेत. शहराचा स्वच्छतादूत म्हणून शहरात स्वच्छतेविषयी असलेली व्यवस्था कार्यक्षम असली पाहिजे. कचरा संकलनासाठी येणारी गाडी वेळेवर आली पाहिजे. गाडी येणार नसेल तर आगाऊ सूचना मिळाली पाहिजे. दुकानदारांकडे डस्टबीन असावेत. हॉटेल व्यावसायिक आणि लग्न समारंभ कार्यालयांकडे कचऱ्याचे वर्गीकरण व्हायला हवे. ओपन बार बंद केले पाहिजे. सिंगल यूज वस्तू बंद करून पुनर्वापर होणाऱ्या वापरल्या पाहिजे. धार्मिक कार्यक्रम, सण, उत्सव, यात्रा-जत्रा काळात अन्नदान व महाप्रसाद वाटप ताटवाटीतच असले पाहिजे. त्यासाठी प्लेट बँक ही संकल्पना मोठ्या प्रमाणावर राबवली गेली पाहिजे. शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करून बेजबाबदार नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली पाहिजे. पदपथांवर पाळीव प्राण्यांना शौचासाठी आणण्यास बंदी असावी किंवा त्यांच्या मालकांकडून ती विष्ठा उचलण्याचे बंधन असावे. याची अंमलबजावणी काटेकोरपणे करून दंडात्मक कारवाई करताना राजकीय हस्तक्षेप नसावा. कचरा वर्गीकरणप्रमाणे त्याची विल्हेवाट लावताना ठराविक चौकात डिजिटल डिस्प्ले असावा. शहरात मोकळे रिकामे असलेले प्लॉटमालकांनी नेहमी स्वच्छ ठेवण्याचे बंधन असावे. अंत्यविधीसाठी विद्युत दाहिनीचा वापर वाढावा. त्यासाठी अनुदान द्यावे. पथारीवाल्यांकडून होणारा कचरा उचलण्याचे बंधन त्यांना असावे. रस्ते आठवड्यातून एकदा धुवावेत. त्यासाठी प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरावे. पीएमपीची वापरलेली तिकीट टाकण्यासाठी दर्शनी भागात ड्रॉपबॉक्स असावेत. बसमध्ये स्वच्छतेविषयी डिजिटल डिस्प्ले असावा. शेकोट्यांवर बंदी आणावी. सिंगल यूज प्लॅस्टिकची बंदीची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी. शेतीमालासाठी पारंपरिक बारदान गोनपटाचा वापर झाला पाहिजे. प्लॅस्टिक नायलॉनचा वापर थांबला पाहिजे. ई कचरा संकलनाची जनजागृती मोठ्या प्रमाणावर केली पाहिजे. फुग्यांची सजावट, प्लॅस्टिक फुले यावर पूर्णपणे बंदी असली पाहिजे. शहर स्वच्छ राहण्याला पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी प्रत्येकाने सामुदायिक जबाबदारी घेतली पाहिजे.
-------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक पूर्ण; पहिला ड्रोन व्हिडिओ आला समोर, उद्घाटनाची तारीख काय?

Salman Agha Runout: आधी रनआऊट झाला अन् मग हेल्मेट फेकलं... पाकिस्तानच्या सलमान आघावर ICC ची कारवाई

Maharashtra State Cooperative Bank : राज्य बँक ठरली यूपीआय स्वीकारणारी देशातील पहिली शिखर बँक

LPG Gas: गॅस तुटवड्याच्या काळात उज्ज्वला गॅस योजनेचं काय झालं? खडसे यांनी उपस्थित केला महत्त्वाचा मुद्दा, म्हणाल्या...

VIDEO : लिफ्टमध्ये अडकला सात महिन्यांच्या चिमुकल्याचा हात, पुण्यातील घटना; धडकी भरवणारा व्हिडीओ समोर...

SCROLL FOR NEXT