पिंपरी-चिंचवड

धोकादायक सांगवडे पुलावरून पुन्हा वाहतूक सुरु

CD

सोमाटणे, ता. १४ ः बांधकाम विभाग जिल्हा परिषद पुणे यांनी धोकादायक असल्याने सांगवडे पुलावरून वाहतूक बंद केली आहे. तरी या पुलावरून पुन्हा दुचाकीस्वारांचा वावर सुरु झाला आहे.
कुंडमळ्याच्या घटनेनंतर चारचाकी वाहतुकीसाठी बंद असलेला पवना नदीवरील हा धोकादायक लोखंडी पूल पादचारी तसेच सर्व वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. नवीन पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत वाहनचालकांनी पुलावर प्रवेश करू नये यासाठी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद पुणे यांनी पुलाच्या दोन्ही बाजूला लोखंडी पत्रा व संरक्षक अँगल तसेच पत्रा तोडू नये यासाठी त्यालगत सिमेंटचे अवजड ब्लॉक बसविले होते. या लोखंडी पत्र्यामुळे पुलावरील मार्ग पूर्ण बंद झाला होता. तेव्हापासून नागरिकांना देहूरस्ता, पिंपरी-चिंचवड, पुणे येथे जाण्यासाठी सोमाटणे मार्गे वळसा घालून जावे लागत होते. त्यामुळे प्रशासनाचे दुर्लक्ष होताच लोखंडी पत्रा दूर करून रस्ता खुला करण्यात आला. या संधीचा फायदा घेत नागरिकांनी प्रवेशमार्गावरील लोखंडी अँगल तोडून मार्ग खुला केला. सध्या या पुलावरून दुचाकीची वाहतूक जोरात सुरु आहे. या पुलाचे आधारस्तंभ तुटले असून तो केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे. कुंडमळ्याच्या अपघाताची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी वाहतूक बंद करण्याची गरज आहे.

PNE25V67751

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSMT: अख्ख्या महाराष्ट्राने श्वास रोखून धरला.. मुंबईतल्या सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅगचा थरार! बॉम्बशोधक पथकाला बॅगेत काय सापडलं?

Nashik Leopard Attack VIDEO : नाशिकमध्ये भरवस्तीत बिबट्याचा धुमाकूळ! ; दोन नागरिकांसह वनविभागाचा कर्मचारी हल्ल्यात जखमी

Flamingo: वातावरणातील बदलाचा फ्लेमिंगोंना फटका! परदेशी पाहुण्यांच्या आगमनाचे वेध

Ratnagiri Farmer: केवळ दोन शेळ्यांपासून सुरू झालेला प्रवास! साई कदम यांच्या शेळीपालनातून लाखोंचे उत्पन्न, कोकणातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी कहाणी

Leopard Attack : ‘एआय’ला भेदून शेळ्यांवर झडप; बिबट्याकडून बोकडाचा फडशा, सायरनही फेल

SCROLL FOR NEXT