पिंपरी-चिंचवड

प्रश्नमंजूषा स्पर्धेसाठी मृण्मयी, श्रेयाची निवड

CD

पिंपरी, ता. १४ ः वडमुखवाडीतील श्री सयाजीनाथ महाराज विद्यालयातील मृण्मयी विश्वास कुलकर्णी आणि श्रेया नरेश यम्मलवार या दोघींची राज्यस्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धेसाठी निवड झाली. ही स्पर्धा नागपूरमध्ये होईल.
भारत विकास परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र पुणे शाखेतर्फे सोलापूरमधील एस. पी. एम. इंग्लिश स्कूलमध्ये ‘भारत को जानो’ प्रांतस्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धा नुकतीच झाली. या स्पर्धेत या दोघींनी लहान गटात भागी घेतला. राज्यातील विविध जिल्ह्यांतील ११ संघ स्पर्धेमध्ये सहभागी झाले. या दोघींनी दोघींनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. त्यांनी पुण्यातील विमाननगर येथील सिंबायोसिस इंटरनॅशनल स्कूलमध्ये ऑगस्ट महिन्यात झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेतही प्रथम क्रमांक मिळवला होता. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार रामभाऊ मोझे, संस्थेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मोझे, संस्थेच्या सदस्या प्रा. अलकाताई पाटील, विद्यालयाचे प्राचार्य राजकुमार गायकवाड यांनी दोघींचे अभिनंदन केले. या विद्यार्थिनींना विद्यालयातील हिंदी विषय प्रमुख डॉ. कल्याण वाघ, हिंदी विषयाचे शिक्षक भाऊसाहेब जाधव , सहशिक्षिका अर्चना पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Riteish Deshmukh ने शेअर केला वडीलांचा व्हिडिओ, शिवजयींतीवर काय म्हणाले होते विलासराव देशमुख?

Winter Olympics 2026 : स्पर्धा नेमकी कशाची? स्पर्धेला सुरुवात होताच तीन दिवसात १० हजार कंडोमचा वापर

Latest Marathi News Live Update : एसीबी ट्रॅपचा धक्का, मंत्री नरहरी झिरवळ ‘नॉट रिचेबल’; पीएवर पैसे मागितल्याचा आरोप

Mumbai News : पलाश-स्मृती मानधना वाद उच्च न्यायालयात 

Farmer Debt Relief Scheme : कर्जमाफीसाठी सरकारची तयारी; अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा, ३० जूनपूर्वी घोषणा शक्य

SCROLL FOR NEXT