गुंतवणुकीच्या नावाखाली
सुमारे ७३ लाखांची फसवणूक
पिंपरी : शेअर बाजार आणि आयपीओसाठी गुंतवणूक करण्यास सांगून भोसरी एका व्यक्तीची ७२ लाख ६४ हजार रुपयांना ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी विकास विजयकुमार साळवी (रा. भोसरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी ईशिता पॉल व इतर आरोपींवर गुन्हा दाखल केला. ईशिताने फिर्यादीचा विश्वास संपादन करून ‘काईट इ मार्ट’ या बनावट ‘युआरएल’च्या माध्यमातून आरोपीला गुंतवणुकीस भाग पाडले. त्याला दोन कोटी ४६ लाख रुपये एवढा नफा दाखविण्यात आला, मात्र नफ्यासह गुंतवलेली रक्कम काढण्यासाठी जमा रकमेच्या १२ टक्के शुल्काची मागणी करण्यात आली. त्यानंतरही रक्कम परत करण्यात आली नाही.
------------------
मोबाईल हॅक करून आठ लाखांचा गंडा
पिंपरी : एका सेवानिवृत्त व्यक्तीचा मोबाईल हॅक करून अज्ञात व्यक्तीने त्यांच्या बँक खात्यातून सात लाख ७९ हजार रुपये काढून ऑनलाइन फसवणूक केली. या प्रकरणी अरुण निवृत्ती गवळी (रा. पिंपरी) यांनी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला. अज्ञात व्यक्तीने फोन करून फिर्यादीची सर्व माहिती मिळवली. त्यानंतर त्यांचा मोबाईल हॅक केला. त्यानंतर मोबाईल नंबर लिंक असलेल्या बँक खात्यातून रक्कम काढली.
--------------------
जुन्या भांडणातून तरुणाला मारहाण
पिंपरी : चिंचवड जुन्या भांडणातून तिघांनी एका तरुणाला शिवीगाळ करीत पट्ट्याने मारहाण केली. याप्रकरणी अथर्व बबन कुमजकर (रा. चिंचवड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी रवी घोडेराव (रा. वेताळ नगर, चिंचवड), साहिल आणि एका अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला. आरोपींनी फिर्यादीला धमकी देऊन शिवीगाळ केली. साहिलने त्यांचा हात धरला आणि इतर दोघांनी अथर्वच्या डोक्यात कंबरेच्या पट्ट्याने मारून त्यांना जखमी केले.
----------------------
पिस्तूल बाळगल्याने तरुणाला अटक
पिंपरी : बेकायदारित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी जुनी सांगवी एका तरुणाला अटक केली. प्रेम किसन चव्हाण (वय २१, रा. पिंपळे गुरव) असे आरोपीचे नाव आहे. औंध जिल्हा रुग्णालयाजवळ एक तरुण पिस्तूल घेऊन आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. झडतीत त्याच्याकडे ५० हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल आणि एक काडतूस सापडले.
----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.