पिंपरी-चिंचवड

द्रुतगती मार्गावर स्थानिकांना विनामूल्य प्रवेश देण्याची मागणी

CD

सोमाटणे, ता. १७ ः द्रुतगती मार्गाने शेताकडे जाण्यासाठी प्रवास करताना हजारो रुपयांच्या दंडाचा भुर्दंड बसला असून हा दंड माफ करून स्थानिकांना विनामूल्य प्रवेश देण्याची मागणी करण्यात येत आहे. सध्या अनेक स्थानिक वाहन चालकांवर पन्नास हजारापेक्षा अधिक रकमेचा दंड पडलेला आहे, अशी माहिती जमिन हक्क परिषदेचे अध्यक्ष माऊली सोनवणे यांनी दिली.
अपघात टाळण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने संपूर्ण ९४ किलोमीटर अंतराच्या किवळे ते कळंबोली दरम्यान सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याने नियम मोडणाऱ्या चालकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते. याचा सर्वाधिक फटका स्थानिकांना बसत असून सेवा रस्ता नसल्याने शेतात किंवा इतर कामासाठी द्रुतगती मार्गाने दुसऱ्या गावाला जावे लागते. द्रुतगती मार्गावर नो एंट्रीतून प्रवेश करताच स्थानिकांना दंडाचा फटका बसतो. किमान दीड हजारापेक्षा अधिक दंडाचे परिवहन विभागाकडून चलन येते. दंड भरला नाही तर न्यायालयाची पायरी चढण्याची वेळ येऊ शकते.
सेवा रस्ता नसल्याने स्थानिक शेतकऱ्यांना चार ते पाच किलोमीटर अंतराच्या प्रवासासाठी हा दंडाचा भुर्दंड बसत असून हा दंडाचा फटका थांबवण्यासाठी तातडीने किवळे ते कुसगाव दरम्यान बाहेर व आत प्रवेश करण्याच्या ठिकाणांवरील सीसीटीव्ही कॅमेरे हटवावे, भूमिपुत्रांना द्रुतगतीला जाण्या-येण्यासाठी प्रवेश खुला करावा व वाहनांवरील दंड रद्द करावा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा निवेदनाद्वारे जमिन हक्क परिषद, शेतकरी कृती समिती व भारतीय किसान संघाने दिला आहे, अशी माहिती जमिन हक्क परिषदेचे अध्यक्ष माऊली सोनवणे, शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सुभाष धामणकर, भारतीय किसान संघाचे अध्यक्ष विश्वनाथ शेलार, माजी नगराध्यक्ष कृष्णा कारके, दिनकर शेटे आदींनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav: कसोटीबाबत तळमळ; पण... टी-२० स्पेशालिस्ट सूर्यकुमार यादवचे पारंपरिक क्रिकेटबाबत मत

Shri Guru Paduka Darshan Mahotsav : श्रीगुरू पादुका दर्शन महोत्सवाची उत्कंठा,स्वामी स्वरूपानंदांच्या हस्ते शनिवारी उद्‍घाटन, गुरू श्री एम यांचे रविवारी व्याख्यान

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरातील बिंदू चौकात गॅस गळतीमुळे आग

नाटक सुरु असताना अस्ताद काळे प्रेक्षकावर का भडकला? नाटक मध्येच थांबवून चांगलंच सुनावलं

IPS Sandeep Karnik : नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, नेमकं प्रकरण काय? २०१९ मध्ये काय घडलं होतं?

SCROLL FOR NEXT