पिंपरी, ता. १६ : गेल्या तीन महिन्यांपासून विस्कळीत असलेला शहरातील रास्त भाव धान्य दुकानदारांचा धान्य पुरवठा अंशतः सुरळीत होणार आहे. या धान्यांचे उद्या सोमवारपासून (ता. १७) शिधापत्रिकाधारकांना वितरण होणार आहे. ज्या दुकानदारांना धान्य मिळाले नाही, त्यांनाही पुढील आठवड्यात धान्य दिले जाणार आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यात दर महिन्याला होणारा धान्य पुरवठा वेळेवर होत नाही. परिणामी, सर्वसामान्य शिधापत्रिकाधारकांची हेळसांड होत आहे. धान्य वितरण करण्यासाठी नवीन ठेकेदार नियुक्त केला आहे. परंतु, त्या ठेकेदाराकडे वाहतूक व्यवस्था नसल्याने धान्य वाटप खोळंबले होते. दर महिन्याच्या ३१ तारखेपर्यंत धान्य उचलून ते संबंधित रास्त भाव धान्य दुकानदारांकडे पुरविणे अपेक्षित आहे. मात्र, फेब्रुवारी महिन्यात देण्यासाठी जानेवारी उचलण्यात येणारे धान्य ३१ जानेवारीपर्यंत ठेकेदाराने उचलले नाही. त्यामुळे, धान्याचा पुरवठा झाला नाही. राज्य शासनाने १० फेब्रुवारीपर्यंत धान्य उचलण्याबाबत मुदतवाढ दिली होती.
त्यानुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील रास्त भाव धान्य दुकानात धान्य पुरवठा करण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून काही दुकानांत धान्य पुरवठा सुरू झाला आहे. तर काही दुकानांत अद्याप धान्य दाखल झाले नाही. लवकरच त्यांनाही धान्य उपलब्ध करून दिले जाईल, असे सांगण्यात येत आहे. ज्या दुकानांना धान्य मिळाले आहे. त्या दुकानदारांकडून सोमवारपासून (ता. १७) धान्य वाटप केले जाणार आहे.
मार्चचाही कोटा मिळणार
या महिन्यात फेब्रुवारीचे धान्य मिळणार आहे. याबरोबरच पुढील मार्च महिन्यातील धान्याचाही कोटा दुकानदारांना दिला जाणार आहे. दहा दिवसांच्या आत मार्च महिन्यातील धान्याचेही वाटप केले जाणार आहे. २५ फेब्रुवारीच्या आत धान्य दिले जाईल, असे दुकानदारांना सांगण्यात आले आहे.
धान्याचा कोटा प्राप्त झाला आहे. काही दुकानांत अजून आलेला नाही. उद्या म्हणजेच सोमवारपासून आम्ही धान्य वाटप करणार आहोत. मार्च महिन्याचे देखील धान्य २५ फेब्रुवारीच्या आत मिळणार आहे.
- विक्रम छाजेड, रास्त भाव धान्य दुकानदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.