पिंपरी, ता. १६ ः नेहरुनगर येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून (एसआरए) विकसित करण्यात आलेल्या पुनर्वसन प्रकल्पातील १४० घरांचे नुकतेच वाटप करण्यात आले. गेल्या सहा महिन्यांपासून लाभार्थ्यांना घराची प्रतीक्षा होती. अखेर हक्काच्या घराचा ताबा मिळताच त्यांनी समाधान व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडीधारकांना हक्काची घरे बांधून देण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या वतीने पुनर्वसन प्रकल्प बांधण्यात येत आहेत. त्यापैकी नेहरुनगर येथील डॉ. आंबेडकरनगर पुनर्वसन प्रकल्पाचे काम मागील दीड वर्षापूर्वी सुरू करण्यात आले. त्यासाठी येथील रहिवाशांचे यशवंतनगर येथे तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले आहे. मागील सहा महिन्यांपूर्वी प्रकल्पाच्या इमारतीचे काम पूर्ण झाले. काही कामे प्रलंबित असल्यामुळे वाटप पुढे ढकलण्यात आले होते. शनिवारी (ता. १५) एका कार्यक्रमात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पाच लाभार्थ्यांना सदनिकांच्या चाव्या देऊन घरांचे वाटप सुरू करण्यात आले.
लाभार्थी हनुमंत पुटगे म्हणाले,‘‘सरकारने सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. केवळ घरच नाही; तर इमारतीसाठी लिफ्ट, पाणी पुरवठा, वीज अशा प्राथमिक सुविधा दिल्या आहेत. आता नवीन घरात आल्याचे समाधान वाटते. प्रकल्पाचे काम चांगले केले आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.