पिंपरी-चिंचवड

शिवजयंतीमित्त प्रबोधन पर्वाचे उद्‍घाटन शहरातील पाच ठिकाणी विविध कार्यक्रम; आजपासून महानाट्य

CD

पिंपरी, ता. १६ ः हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महान कार्याचा आणि व्यापक विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी महापालिकेने प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याचे उद्‍घाटन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते झाले. सोमवारपासून (ता. १७) बुधवारपर्यंत (ता. १८) शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्य प्राधिकरणातील नियोजित महापौर निवास मैदानावर होणार आहे.
निगडीतील शक्ती-शक्ती चौक, अ प्रभाग जवळील नियोजित महापौर निवास मैदान, चिंचवड येथील छत्रपती संभाजीनगर, डांगे चौक, थेरगाव आणि पिंपरी एच. ए. कॉलनी आदी ठिकाणी प्रबोधन पर्वाअंतर्गत कार्यक्रम होत आहेत. भक्ती-शक्ती चौकात उद्‍घाटन झाले. लोकशाहीर रामानंद उगले यांनी ‘शाहिरीतून शिवदर्शन’ कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेजस्वी विचार तसेच प्रेरणादायी जीवनावर आधारित पोवाड्यांचे सादरीकरण केले. नितीन बानुगडे पाटील यांचे ‘असे होते छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर व्याख्यान झाले. ते म्हणाले, ‘‘सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारके त्यांनी केलेल्या तेजस्वी कार्यामुळे दिसतील. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही मग ते कोणत्याही प्रांतातील असो, स्त्रियांचा सन्मान करा, परस्त्री मातेसमान असते, अशी अनेक मूल्ये महाराजांनी पुढच्या पिढीला दिली. जगातील पहिला सर्जिकल स्ट्राईक महाराजांनी पुण्याच्या लाल महालात केला. त्यांनी त्यांच्या आयुष्यात बजावलेल्या कर्तव्याची बरोबरी कोणीच करू शकत नाही. प्रत्येकाला न्याय मिळेल, असे स्वराज्य स्थापन करून प्रत्येकाच्या मनात स्वराज्याविषयी आपुलकी निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या तेजस्वी कार्यामुळे केवळ देशात नाही तर संपूर्ण जगात त्यांना सर्वोत्तम आदर्श राजे म्हणून ओळखले जाते. त्यांच्या या व्यापक कार्याचे आणि इतिहासाचे पठण आजच्या पिढीने करायला हवे.’’ मारुती भापकर यांनी प्रास्ताविक केले. प्रफुल्ल पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur : नववर्षाच्या स्वागताला सावळ्या विठुरायाचे मंदिर सजले; गुढीपाडव्यानिमित्त पंढरपुरात भक्तांची मांदियाळी, पांडुरंगाला अर्पण केला 5 किलो वजनाचा साखरेचा हार

Dhananjay Sawant Accident : भाजप नेत्याच्या गाडीचा मध्यरात्री भीषण अपघात, कंटेनरच्या धडकेत फॉर्च्युनरचा चक्काचूर, जीवित हानी टळली

Indian Army Rocket System: आता शत्रूंची खैर नाही! पोखरणमध्ये पिनाका रॉकेटची यशस्वी चाचणी; भारताच्या संरक्षणशक्तीला नवी उंची

'या' तारखेवर जन्मलेल्या लोकांचा एकमेकांशी असतो 36 चा आकडा ! भेटल्यावर भांडण होणारच

Exam Paper Theft: धक्कादायक! दहावीच्या विद्यार्थ्यानेच चोरली प्रश्नपत्रिका; सांगोला विद्यामंदिरात खळबळ..

SCROLL FOR NEXT