पिंपरी, ता. १६ : सिंधी प्रीमियर क्रिकेट लीगच्या सहाव्या पर्वाचे भारतीय क्रिकेटपटू राहुल त्रिपाठी याच्या उपस्थितीत शानदार उद्घाटन झाले. उद्घाटनाच्या सामन्यात सिंधफूल रेंजर्स संघाने सुलतान्स ऑफ सिंधवर सुपर ओव्हरमध्ये थरारक मात करत विजयी सलामी दिली. येत्या ९ मार्चपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे.
पिंपरीतील मृणाल क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा भरविण्यात आली आहे. उद्घाटन सोहळ्यावेळी उद्योजक डब्बू आसवानी, श्रीचंद आसवानी, संयोजक कन्वल खियानी, हितेश दादलानी, कमल जेठानी, अंकुश मूलचंदानी, नरेश नशा, करण आसवानी आदी उपस्थित होते.
स्पर्धेत पुरुष गटात एकूण १६ ; तर महिला गटात एकूण आठ संघ सहभागी झाले आहेत. पुरुषांच्या प्रत्येक संघाचे नाव सिंधी संस्कृतीशी; तर महिला संघांची नावे नद्यांशी निगडित आहेत.
संक्षिप्त धावफलक - सिंधफूल रेंजर्स ः ९ षटकांत ५ बाद ८६ - चिराग निरंकारी ३४, राम पोपटानी २५ (मनीष जगवाणी २-६) व ०.५ षटकांत १ बाद १० विजयी विरुद्ध सुलतान्स ऑफ सिंध ः ९ षटकांत ७ बाद ८६ - राजीव अहुजा ४९, दिनेश रिझवानी ३-२० व १ षटकांत २ बाद ९.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.