पिंपरी-चिंचवड

चिखलीच्या विकास प्रकल्पातील अडथळे दूर आरक्षणे ताब्यात घेण्याची प्रक्रिया होणार सुरु, महापालिका प्रकल्प विकसित करणार

CD

पिंपरी, ता. १८ ः पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी औद्योगिक क्षेत्राला लागून असणाऱ्या चिखली परिसरातील बेकायदेशीर बांधकाम आणि पत्राशेडवर महापालिकेने कारवाई केली आहे. संपूर्ण क्षेत्र मोकळे झाल्यानंतर चिखली, कुदळवाडी, जाधववाडी भागातील महापालिकेची आरक्षणे ताब्यात घेण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. प्रस्तावित प्रकल्प विकसित झाल्यानंतर या भागातील रहिवाशांना नागरी सुविधा मिळणार आहेत.
चिखली, कुदळवाडी, जाधववाडी भागाचा पायाभूत विकास साधण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने १९९६-९७ च्या विकास आराखड्यामध्ये आरक्षणे निश्चित केली आहेत. परंतु, या भागात वाढत गेलेली अनधिकृत बांधकामे आणि पत्राशेड यामुळे आरक्षित जागा ताब्यात घेण्यास असंख्य अडचणी आल्या. राजकीय दबाव आणि स्थानिकांचा विरोध झाल्याने या भागातील महापालिकेचा विकासाचा उद्देश बाजूला राहत गेला. येथील अनधिकृत बांधकामे व पत्राशेड धारकांना महापालिकेने अनेकवेळा नोटिसा दिल्या. तरीही, आपली अनधिकृत बांधकामे काढून घेण्यास त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
गेल्या महिन्यात येथील ४ हजार ३०० व्यावसायिकांना अंतिम नोटीस देऊन, बांधकामे व पत्राशेड स्वतःहून काढण्यासाठी पंधरा दिवसांचा अवधी देण्यात आला होता. तरी ही रहिवाशांनी आपली अनधिकृत बांधकामे काढली नाहीत. त्यावर महापालिकेने अनधिकृत बांधकामे व पत्राशेडवर पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण कारवाई केली. महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मुलन विभागाने आजअखेर चिखली, कुदळवाडी, जाधववाडी येथील ९३२ एकर भूभागावरील तब्बल ४ हजार ७९६ अनधिकृत बांधकामे व पत्राशेड कारवाई करून हटवली. त्यामुळे १९९६-९७ च्या महापालिका विकास आराखड्यातील पाण्याची टाकी, प्राथमिक शाळा, टाऊन हॉल, वाहनतळ यासह रस्त्याची आरक्षित जागा ताब्यात घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आरक्षित जागा ताब्यात आल्यानंतर विकास प्रकल्प राबविण्यास गती देण्यात येणार असल्याचे महापालिका नगररचना विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.


नियोजित प्रकल्प -
- पाण्याची टाकी
- प्राथमिक शाळा
- टाऊन हॉल
- वाहनतळ
- बस टर्मिनल

....

नियोजित रस्ते -

- १२ मीटर
- १८ मीटर
- २४ मीटर
- ३० मीटर


‘‘चिखली-कुदळवाडी-जाधववाडी भागातील आरक्षित जागा ताब्यात घेण्यासाठी सर्वेक्षण केले जाईल. जागा मालकांना टीडीआर आणि ‘एफएसआय’चा मोबदला देऊन जागेचा आगाऊ ताबा घेण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात त्यासाठी कॅम्प लावून, ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
- प्रसाद गायकवाड, उपसंचालक, नगररचना विभाग

------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयातील निवासी डॉक्टर उद्यापासून संप पुकारणार

Summer Mobile Cooling Tips : उन्हाळ्यात तुमचा फोनही 'भट्टी'सारखा तापतोय? मग 'ही' १ छोटी सेटिंग करा आणि फोन ठेवा बर्फासारखा कूल!

Vaibhav Sooryavanshi चे भारतीय संघात पदार्पण म्हणजे, संजू सॅमसन-सूर्यकुमार यादव यांच्यासाठी Bad News? रिपोर्टने उडवलीय झोप

Gold Investment: अक्षय तृतीयेला सोने घ्यायचंय? दागिने, डिजिटल, बार की ETF! खरा फायदा कुठे? चुकीचा पर्याय पडेल महागात

IPL 2026: रोहित शर्मा पंजाबविरुद्ध खेळणार नाही, पण मग मुंबई इंडियन्ससाठी ओपनिंग करणार कोण? या खेळाडूंचा पर्याय

SCROLL FOR NEXT