सफाईचे काम करणाऱ्या
चार बहिणींना मारहाण
पिंपरी : सफाई कामासाठी गेलेल्या पाच महिलांना सहा जणांनी मिळून मारहाण केली. ही घटना बावधन येथे घडली.
मारहाण झालेल्या महिलेने बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजय कांबळे, संतोष शर्मा, स्वप्नील कांबळे आणि तीन महिला यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी महिला आणि त्यांच्या चार बहिणी बावधनमधील सिद्धार्थ नगर येथील एका शाळेसमोर स्वच्छतेचे काम करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना मारहाण करण्यात आली.
--------------------
डोक्यात बाटली फोडल्याने तरुण जखमी
पिंपरी : शाळेच्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या मित्राला भेटण्यासाठी गेलेल्या तरुणाला एकाने शाळेचे गेट उघडण्यास सांगितले. मात्र, आपण इथे नेमणुकीस नसून दुसरा सुरक्षारक्षक असल्याचे सांगितल्याने तरुणाच्या डोक्यात दारूची बाटली फोडण्यात आली. ही घटना पिंपरीतील कमला नेहरू शाळेजवळ घडली. रविराज जामजगली (वय २८, रा. शास्त्रीनगर, पिंपरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नेल्सन नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे कमला नेहरू शाळा येथे सुरक्षारक्षक म्हणून काम करणारा मित्र गोरख वाळुंज याला भेटण्यासाठी गेले होते. त्याला भेटून परत येत असताना आरोपी नेल्सन याने रविराज यांना गेटवर अडवले. नेल्सन याने गेट उघडण्यास सांगितले. मात्र, इथे आपण नेमणुकीस नसून दुसरा सुरक्षारक्षक असल्याचे रविराज यांनी सांगितले. त्यानंतर आरोपीने रविराज यांच्या डोक्यात दारूची बाटली मारून त्यांना गंभीर जखमी केले.
-----------------------
‘तू माझ्याकडे का बघतो’
म्हणत तरुणाला मारहाण
पिंपरी : ‘तू माझ्याकडे का बघतो’, असे म्हणत किरकोळ कारणावरून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना मारुंजी येथे सरकार चौकात घडली. दीपक पाटील (वय ३०, रा. मारुंजी) असे जखमीचे नाव असून त्यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गौरव बुचडे (रा. मारुंजी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी हा फिर्यादीजवळ आला. आणि ‘तू माझ्याकडे का बघतो’, असे म्हणत दांडक्याने मारहाण केली. यामध्ये दीपक यांच्या हाताला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर आरोपीने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.
-----------------------
जुगार प्रकरणी तिघांवर गुन्हा
पिंपरी : जुगार अड्डा चालवणाऱ्या तिघांवर पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल केला. ही कारवाई रहाटणी फाटा येथे करण्यात आली. राजू टोम्पे (वय ४१, रा. काळेवाडी फाटा), बाबू जॉर्ज (वय ५०, रा. रहाटणी), प्रमोद तेजी (रा. शिवाजीनगर, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. आरोपी राजू आणि बाबू हे दोघे रहाटणी फाटा येथे पदपथावर बसून लोकांकडून मटका जुगारासाठी आकडे घेत होते. लोकांकडून घेतलेले आकडे राजू आणि बाबू हे आरोपी प्रमोद याला पाठवत होते. पोलिसांनी कारवाई करत आरोपींकडून २० हजार ४४० रुपये किमतीचे साहित्य जप्त केले.
------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.