पिंपरी, ता. १८ : खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या आरोपीची निगडीतील त्रिवेणीनगर येथे मिरवणूक काढल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपींसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला. तसेच त्यांची मिरवणूक काढलेल्या ठिकाणी धिंड काढली.
शाम सहदेव यत्नाळकर (वय ३४), मानतेश सिद्धू यत्नाळकर (वय २७), हनुमंता सिद्धू यत्नाळकर (वय २२), महेश शिवलिंग बोरगावकर (वय ४३), अकीब बंदनमाज सौदागर (वय २४, सर्व रा. दुर्गानगर हाऊसिंग सोसायटी, त्रिवेणीनगर, निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी शाम यत्नाळकर याच्यावर सातारा जिल्ह्यातील वाई पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यात त्याला अटक झाल्यानंतर तो सात वर्षांनी म्हणजेच १३ फेब्रुवारीला तुरूंगातून जामीनावर बाहेर आला होता. घरी आल्यानंतर आरोपींनी त्याची घराच्या परिसरात मिरवणूक काढत फटाके फोडले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.