पिंपरी-चिंचवड

पोलिसांच्या तक्रार निवारण दिनात १२ हजार ८४३ तक्रारी अर्ज निकाली

CD

पिंपरी, ता. १९ : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील नागरिकांशी थेट संवाद साधता यावा व तक्रारदार यांची गैरसोय न होता त्यांच्या तक्रारीचे वेळेत निरसन व्हावे, यासाठी सर्व पोलिस ठाण्यात प्रत्येक महिन्याच्या दर शनिवारी सकाळी साडेदहा ते दुपारी दोन या वेळेत तक्रार निवारण दिनाचे आयोजन केले जात आहे. १८ मे २०२४ ते १५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत १२ हजार ८४३ तक्रारी अर्ज निकाली काढण्यात आले.
पोलिस आयुक्तालय हद्दीतील नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकारण होण्यासाठी आयुक्तालयामार्फत विविध माध्यमांद्वारे तक्रारी स्वीकारल्या जातात. यामध्ये वेब पोर्टल, व्हॉट्सअॅप, ई-मेल तसेच प्रत्यक्षरीत्या पोलिस आयुक्त कार्यालय, पोलिस उपायुक्त कार्यालय, सहाय्यक पोलिस आयुक्त कार्यालय व पोलिस ठाणे येथे दिलेले तक्रारी अर्ज तसेच महाराष्ट्र शासनाचे आपले सरकार पोर्टल, केंद्र शासनाचे पी. जी. पोर्टल यांसह शासन व वरिष्ठ कार्यालयाकडून वेगवेगळ्या प्रकारचे तक्रारी अर्ज प्राप्त होत असतात. या तक्रार अर्जासंदर्भात मुदतीत व उचित कार्यवाही करून अर्जाची निर्गती करणे अपेक्षित आहे. नागरिकांनी दिलेल्या तक्रारी अर्जाची वेळेत कार्यवाही न झाल्याने सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत असते. त्यामुळे पोलिस उपायुक्त, सहाय्यक पोलिस आयुक्त तसेच पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांच्या उपस्थितीत तक्रार निवारण दिनाचे आयोजन केले जात आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT