पी. के. इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल : पिंपळे सौदागर, ता.१९ : व्ही.एच. बी. पी.पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचलित पी. के. इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल अँड जुनिअर कॉलेज येथे शिवजयंतीनिमित्त शाळेचे संस्थापक प्रो.डॉ. जगन्नाथ काटे, प्राचार्या प्रो. डॉ. धनश्री सोनवणे यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी रहाटणी येथील शिवाजी चौक ते पी. के. स्कूल पिंपळे सौदागर मार्गावर मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यानी गाण्यांच्या तलवार लेझीमचे प्रकार सादर केले. मिरवणुकीमध्ये शाळेचे संस्थापक प्रो .डॉ. जगन्नाथ काटे, प्राचार्या प्रो. डॉ.धनश्री सोनवणे, प्रथमेश काटे आदी सहभागी झाले. तसेच शिक्षकांनी भगवे फेटे परिधान करत मिरवणुकीत सहभाग दर्शवला .
---------
भोसरी परिसरात शिवजयंतीचा उत्साह
भोसरी, ता.१९ : भोसरी, इंद्रायणीनगर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती रक्तदान शिबिर, व्याख्यान, मिरवणूक, खाऊ वाटप आदी विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.
-----------
भोसरीत ‘एक गाव एक शिवजयंती’
भोसरी येथे पीएमटी चौकात ‘एक गाव एक शिवजयंती’ कार्यक्रमाच्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन मानद पशुकल्याण अधिकारी गोरक्षक शिवशंकर स्वामी यांच्या हस्ते झाले. या वेळी आमदार सुनील शेळके, पिंपरी-चिंचवड मनपा उपायुक्त प्रदीप जांभळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. ‘एक गाव एक शिवजयंती’चे आयोजन भोसरीतील लांडगे लिंबाची तालीम, भवानी तालम, समस्त गव्हाणे तालीम, छावा प्रतिष्ठान दहीहंडी उत्सव, पठारे-लांडगे तालीम, फुगे-माने तालीम, मधले फुगे तालीम, श्री भैरवनाथ दहीहंडी उत्सव, भैरवनाथ कबड्डी संस्था, हिंदवी स्वराज्य ग्रूप, लोंढे तालीम, कृपा साई फाउंडेशन ट्रस्ट, श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, गडकोट सेवेकरी, समस्त गोरक्षक आणि भोसरी ग्रामस्थ यांनी केले.
------------
राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ, लांडेवाडी : विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, माजी आमदार विलास लांडे होते. या वेळी प्राचार्य डॉ. के. जी. कानडे यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी कार्य’ विषयावर व्याख्यान झाले. या वेळी सुधीर मुंगसे, माजी नगरसेवक अजित गव्हाणे, विक्रांत लांडे, उपप्राचार्य प्रा. किरण चौधरी, अश्विनी भोसले, डॉ. धनंजय बागुल, प्राचार्य डॉ. लक्ष्मण चौधरी, डॉ. श्रेया दाणी, डॉ. नेहा बोरसे, प्रा. सारिका जगताप, प्रा. गोपीचंद करंडे आदिंसह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. गोपीचंद करंडे यांनी केले.
BHS25B02591
-------------
संजय वाबळे यांचे जनसंपर्क कार्यालय : येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास माजी आमदार विलास लांडे आणि माजी नगरसेवक संजय वाबळे यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन केले. स्पाइन रस्त्यावरील प्रोग्रेस ऑटिझम एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या पुतळ्याची परिसरातून मिरवणूक काढली. या वेळी शाळेचे संस्थापक विष्णू शिंदे, प्राचार्या जयश्री शिंदे, व्यवस्थापक तुषार जमदाडे, ॲड. आबाजी कापसे आदिंसह शिक्षक आणि विद्यार्थी सहभागी होते.
----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.