पिंपरी-चिंचवड

प्राणी सुश्रूषा केंद्रच ‘आजारी’

CD

अविनाश ढगे ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २५ ः नेहरुनगर येथील महापालिकेचे प्राणी सुश्रूषा केंद्रातील आंतररुग्ण विभाग निर्जंतुकीकरणाच्या नावाखाली गेल्या दीड महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे शहरातील रेबीजसह संसर्गजन्य आजारांनी बाधित भटक्या श्‍वानांवर पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या निगराणीत उपचार होताना दिसून येत नाहीत. महापालिकेने आंतररुग्ण विभाग चालू करण्याचे आदेश कंत्राटदाराला २२ जानेवारी देऊनसुद्धा ते अजूनही सुरू झालेले नाही. यावरुन महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाचे कंत्राटदारावर नियंत्रण नसल्याचे दिसून येते.

काय दिसले प्रत्यक्ष पाहणीत
सोमवारी (ता. २४) सकाळी दहाची वेळ, महापालिकेच्या नेहरुनगर येथील प्राणी सुश्रूषा केंद्रावर कोणी रोझी काही खात नाही म्हणून तर कोणी बॉबी आठ दिवसांपासून आजारी आहे म्हणून उपचारासाठी घेऊन आलेले. बाह्यरुग्ण विभागात पाळीव प्राण्यांची तपासणी करुन त्यांना उपचारासाठी औषधे लिहून देत होते. औषधे बाहेरून घेण्याचा सल्ला तेथील कर्मचारी देत होते. भटक्या प्राण्यांवर पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या निगराणीत उपचार करण्यासाठी असलेले आंतररुग्ण विभाग मात्र बंद होते. अधिक माहिती घेतली असता, ते गेल्या दीड महिन्यापासून बंद असल्याचे कळाले. उपस्थित कर्मचाऱ्यांना बंद असण्याचे कारणे विचारली असता ‘आम्हाला काही माहीत नाही. तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोला,’ असे सांगत होते. रोझी, बॉबी यांचा साभांळ करणारे सोबत असल्यामुळे त्यांच्यावर वेळीच उपचार होऊ शकले. पण, शहरातील रस्त्यावरील भटक्या श्‍वांनावर, मांजरांवर वेळीच उपचार होत नसल्यामुळे मृत्यू होत आहेत. महापालिकेकडून दरमहा लाखो रुपये खर्च करुनही भटक्या प्राण्यांवर उपचार होताना दिसून येत नाहीत.

३५ पिंजरे पडून
महापालिकेने नेहरुनगर येथील प्राणी सुश्रूषा केंद्रात आंतररुग्ण आणि बाह्यरुग्ण विभाग सुरू केला आहे. आंतररुग्ण विभागात शहरातील भटक्या प्राण्यांवर पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या निगराणीत उपचार करण्यासाठी लाखो रुपये खर्च करुन ३५ पिंजरे तयार केले आहेत. पण, गेल्या दीड महिन्यापासून हे पिंजरे बंद स्थितीत आहेत.

अधिकाऱ्यांची ‘तू-तू, मै-मै’
महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांना आंतररुग्ण विभाग कधी सुरू होणार याबाबत विचारले असता ‘हे माझ्या अंतर्गत येत नाही. मुख्य पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अरुण दगडे यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. अरुण दगडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संदीप खोत यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. यावरून प्रशासनातील अधिकारी प्राणी सुश्रूषा केंद्र सुरू करण्याची जबाबदारी न घेता टोलवाटोलवी करताना दिसून येत आहे.

कंत्राटदार फरारी
कंत्राटदाराने सात जानेवारी रोजी महापालिकेला आंतररुग्ण विभागाचे निर्जंतुकीकरण करायचे म्हणून १५ ते २० दिवस बंद ठेवणार असल्याचे पत्र दिले होते. मात्र, अद्याप ते बंद आहे. कंत्राटदाराने आंतररुग्ण विभागाला टाळे ठोकले असून, चावी घेऊन गेला आहे. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांना देखभाल दुरुस्ती करण्यासाठी अडचणी येत आहे. महापालिकेची मालमत्ता असताना कंत्राटदार चावी प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकाकडे न ठेवता सोबत घेऊन गेला आहे.

काय आहे करार....
शहरातील भटक्या श्‍वानांवर उपचार करण्यासाठी महापालिकेने प्राणी सुश्रूषा केंद्रातील आंतररुग्ण विभाग पिपल्स फॉर ॲनिमल या संस्थेला ऑक्टोंबर २०२३ ते २०२६ या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने चालविण्यास दिला आहे. दरमहा या संस्थेला ८० हजार रुपये महापालिकेकडून दिले जात आहे.

आंतररूग्ण विभाग सुरू करण्याची मागणी आम्ही गेले कित्येक दिवस करीत आहोत. याबाबत महापालिका अधिकाऱ्यांची चर्चा केली. मात्र, अधिकारी देखील टोलवाटोलवीची उत्तरे देत आहेत.
- वैशाली दळवी, प्राणी प्रेमी

आंतररूग्ण विभाग चालविणाऱ्या संस्थेला २२ फेब्रुवारी रोजी आदेश दिले आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत ते सुरू न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर ठेवण्यात येईल.
- डॉ. अरुण दगडे, मुख्य पशुसंवर्धन अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DGGIचा कारभार विकृत आणि मनमानी! कारवाई रद्द करा अन् जप्त रोकड व्याजासह परत द्या; मुंबई हायकोर्टानं फटकारलं

Latur Highway Safety Issue: किल्लारी राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा धोका वाढला; संरक्षणभिंत व पथदिव्यांची नागरिकांची मागणी

Nashik News : सिलिंडरबाबत अफवा पसरवाल तर सावधान! नाशिक प्रशासनाचा कडक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गॅस मिळवण्यासाठी नागरिकांच्या लागल्या रांगा

लव्ह बर्ड.. मांजर अन् कोयत्याने वार ! पुण्यात शेजाऱ्यांमध्ये जुंपली, प्रकरण पोलीस ठाण्यात; बातमी वाचून डोक्यावर माराल हात

SCROLL FOR NEXT