पिंपरी-चिंचवड

गुन्हे वृत्त

CD

टायरच्या दुकानाला मोटारीची
धडक; एकाचा मृत्यू
पिंपरी : एका टायरच्या दुकानाला भरधाव मोटारीने धडक दिली. या धडकेत दुकानात झोपलेल्या दुकानदाराचा मृत्यू झाला. ही घटना जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर तळेगाव दाभाडे येथे घडली. महम्मद सलाउद्दीन (वय ३६, रा. तळेगाव दाभाडे) असे या घटनेत मृत्यू झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. या प्रकरणी महम्मद नाझीर अन्सारी (रा. चाकण) यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोटार चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी अन्सारी यांचे दाजी महम्मद सलाउद्दीन यांचे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील काळोखे पेट्रोल पंपासमोर टायरचे दुकान आहे. ते रात्री त्यांच्या दुकानात झोपलेले असताना एका भरधाव मोटारीने टायरच्या दुकानाला जोरात धडक दिली. यामध्ये महम्मद सलाउद्दीन यांचा मृत्यू झाला.

अपहार प्रकरणी एकावर गुन्हा
पिंपरी : ट्रान्सपोर्टच्या गाडीवर चालक म्हणून काम करणाऱ्याने गाडीतून सात लाख सात हजार ४५५ रुपये किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू परस्पर काढून घेत अपहार केला. ही घटना हिंजवडीतील लक्ष्मी चौक ते वाघोली दरम्यान घडली. या प्रकरणी मोशीतील तुपे वस्ती येथील एका व्यक्तीने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमोल प्रकाश सुतार (वय २०, रा. ओंकार कॉलनी, डांगे चौक, थेरगाव, मूळ रा. कोल्हापूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांची ट्रान्सपोर्टची गाडी असून, त्यावर आरोपी अमोल सुतार हा चालक म्हणून काम करतो. त्याच्या गाडीमध्ये हिंजवडी येथून मोबाईल फोन, एअरबड्स आणि एअरपॉड असे इलेक्ट्रॉनिक वस्तू भरून दिल्या होत्या. त्या वस्तू वाघोली येथे पोहोचवायच्या होत्या. प्रवासादरम्यान अमोल याने गाडीतून सात लाख सात हजार ४५५ रुपये किमतीच्या वस्तू काढून घेत त्याचा अपहार केला.

दोघांना बेदम मारहाण; तिघांवर गुन्हा
पिंपरी : तिघांनी मिळून दोघांना बेदम मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना भोसरी एमआयडीसीतील महात्मा फुलेनगर चौक येथे घडली. कुशल नारायण भिसे (वय २३, रा. महात्मा फुले नगर, एमआयडीसी भोसरी) आणि अतिश देवकर अशी मारहाण झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी भिसे यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हेमंत गजेंद्र लोणकर (वय २७), सौरभ भारत दिघे (वय २८, दोघेही रा. विठ्ठलनगर, लांडेवाडी, भोसरी) आणि एक अनोळखी साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी भिसे आणि त्यांचा मित्र अतिश हे एमआयडीसी भोसरीमधील महात्मा फुलेनगर चौकात थांबले होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपींनी भिसे आणि देवकर यांना लाथाबुक्क्यांनी आणि दांडक्याने बेदम मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.


गुटखा वाहतूक प्रकरणी एकाला अटक
पिंपरी : मोटारीतून गुटखा वाहतूक करणाऱ्या एकाला दिघी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई चऱ्होलीतील पठारे मळा येथे करण्यात आली. गणेश ऊर्फ दीपक लक्ष्मण गाडे (वय ३४, रा. चोविसावाडी, चऱ्होली बुद्रुक, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. दिघी पोलिसांनी पठारे मळा चऱ्होली येथे एका मोटारीची तपासणी केली असता मोटारीत प्रतिबंधित गुटखा आढळून आला. पोलिसांनी मोटार आणि गुटखा असा एकूण १२ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सामान्यांना दिलासा! पेट्रोल पंपावरून मिळणार रॉकेल; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या नवीन योजना आणि किंमत...

BCCI जसप्रीत बुमराहला २ कोटींची नुकसान भरपाई देणार; त्यांच्या एका निर्णयाने झालाय घोळ, करायला गेले एक अन् घडलं भलतंच...

Latest Marathi News Live Update : बालेवाडीत ढगांची गर्दी; रिमझिम पावसाची सुरुवात

Yeola Traffic Rule : येवलेकरांना मोठा दिलासा! २४ मार्चपासून मनमाड-मालेगाव मार्गावर दिवसा अवजड वाहतुकीला बंदी

राहुल मोदीशी लग्न करणार श्रद्धा कपूर? मावशी तेजस्विनी कोल्हापुरेने दिली पहिली प्रतिक्रिया, हसल्या आणि म्हणाल्या-

SCROLL FOR NEXT