वाकड येथे चार दुकानदारांना टोळक्याची हप्त्यासाठी मारहाण
पिंपरी, ता. २५ : हप्ता देण्यास नकार देणाऱ्या चार दुकानदारांना बेदम मारहाण करण्यात आली. हा प्रकार वाकड येथे घडला. यावेळी टोळक्याने या व्यावसायिकांचे साहित्य रस्त्यावर फेकले.
या प्रकरणी सागर अशोक शिंदे (वय ३७, रा. सद्गुरू कॉलनी, वाकड) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमोल किसान कलाटे (वय ३८), अविनाश किसान कलाटे (वय ४०, दोघेही रा. सुखासा सोसायटी, वाकड), कौस्तुभ पवार व इतर तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी अमोल आणि अविनाश यांना अटक करण्यात आली आहे. सागर शिंदे यांचा पदपथावर मोमोज विक्रीचा स्टॉल आहे. दरम्यान, ‘‘येथे व्यवसाय करायचा असल्यास हप्ता द्यावा लागेल,’’ असे म्हणत टोळक्याने सागर यांना दम दिला. तेव्हा पैसे देण्यास नकार दिल्याने अमोल आणि अविनाश यांनी सागर यांना मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले. याचवेळी सागर यांच्या शेजारील बर्गर विक्रेता सलमान अन्सारी, पाणीपुरी विक्रेता जितलाल व पुस्तक विक्रेते विशाल यांनाही टोळक्याने मारहाण केली. तसेच दुकानांतील साहित्य रस्त्यावर फेकले. यानंतर जमलेल्या नागरिकांना दमबाजी करत आरोपींनी पळ काढला होता. पोलिसांनी तातडीने तपास करत दोघांना अटक केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.