पिंपरी, ता. ११ ः‘मित्रत्व हे ‘माझ्या स्मृती माझी जीवनगंगा’ या ग्रंथाचे बलस्थान आहे,’’असे मत महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे व्यक्त केले. ज्येष्ठ लेखक प्रकाश राऊळकर लिखित ‘माझ्या स्मृती माझी जीवनगंगा’ या आत्मकथनपर ग्रंथाचे प्रकाशन करताना राजन लाखे बोलत होते. निगडी प्राधिकरणातील कॅप्टन कदम सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. बसंत बंग, प्रकाशक दिलीप मराठे, लेखक प्रकाश राऊळकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
राजन लाखे म्हणाले, ‘‘जीवनात येणाऱ्या असंख्य व्यक्ती आपल्याला कळत नकळत अनेक गोष्टी शिकवत असतात. आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर ओलांडलेल्या पायऱ्या आयुष्याच्या उत्तरार्धात एखाद्या चित्रपटाप्रमाणे स्मरत राहतात. हीच अनुभूती देणारा ‘माझ्या स्मृती माझी जीवनगंगा’ हा ग्रंथ म्हणजे प्रकाश राऊळकर यांच्या अमृतमहोत्सवी अनुभवाचे संचित आहे. हे संचित गंगेप्रमाणे प्रवाही असून सुखदुःखाचे क्षण त्यांत साक्षेपी वृत्तीने मांडले आहेत. दिलीप मराठे यांनी प्रास्ताविकातून ‘राऊळकर हे एक कलासक्त व्यक्तिमत्त्व असून, लेखन अन् वाचन चळवळीचे ते वारकरी आहेत,’ असे मत मांडले. लेखक प्रकाश राऊळकर यांनी मनोगतातून आपला लेखनप्रवास उलगडून सांगितला.
गणेशस्तवन व सरस्वतीपूजनाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. विधिवत औक्षण करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. गिरीश चौक यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश राऊळकर यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.