पिंपरी-चिंचवड

पीएमपीपेक्षा मेट्रो स्वस्त अन् मस्त

CD

अविनाश ढगे : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ११ : काही दिवसांपूर्वी पीएमपीएमएल मंडळाने बस प्रवासात भाडेवाढ केली आहे. तुलनेने मेट्रोचे तिकीट कमी आणि प्रवासदेखील आरामदायी ठरत आहे. त्यामुळे भाडेवाढीनंतर प्रवासी आता मेट्रोकडे वळत असल्याचे आकडेवारीतून पुढे आले आहे.
पिंपरी ते रामवाडी मेट्रो स्टेशनपर्यंत पीएमपीने प्रवास केल्यास ५० रुपये मोजावे लागतात. याच मार्गावर मेट्रोने प्रवास केल्यास केवळ ३५ रुपये मोजावे लागत आहेत. शिवाय मेट्रोचा प्रवास जलद, वातानुकूलित, शाश्‍वत आणि सुरक्षित ठरतो आहे.
पीएमपीच्या भाडेवाढीनंतर दहा दिवसांतच मेट्रोच्या दोन्ही मार्गिकांवर एक लाख ३६ हजार ४४९ प्रवासी संख्या वाढल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झाले.
तूट वाढत असल्याचे कारण देत पीएमपी प्रशासनाने एक जूनपासून भाडेवाढ केली. तसेच दोन्ही महापालिका क्षेत्रांतील स्वतंत्र पास रद्द करुन एकच ७० रुपये आणि पीएमआरडीए हद्दीत १२० रुपयांचा पास १५० रुपये केला आहे. मासिक पासचे दरही वाढवले आहेत. यामुळे अनेक मार्गांवर २५ रुपयांचे प्रवासभाडे ५० रुपयांवर गेले आहे. पण, मेट्रोचे तिकीट मात्र त्यापेक्षा स्वस्त आहे. पीएमपीने प्रवास करताना वाहतूक कोंडी, वेळेवर बस नाही, ब्रेक डाऊन, चालक व वाहकांचे उद्धट वर्तन, गर्दीत धक्के खात प्रवास, बस थांबे नसल्यामुळे प्रवाशांना उन्हा-पावसात उभे राहणे. तसेच नुकतीच झालेली दरवाढ या सर्वांपासून सुटका मिळण्यासाठी प्रवासी मेट्रोकडे वळत असल्याचे चित्र आहे. मेट्रोच्या पिंपरी ते स्वारगेट (पर्पल मार्गिका) आणि वनाज ते रामवाडी (ॲक्वा मार्गिका) या दोन्ही मार्गिकांवर हे प्रवासी वाढल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
----------
मार्ग - मेट्रोचे दर - पीएमपीचे दर
पिंपरी ते स्वारगेट - ३० - ४०
पिंपरी ते रामवाडी - ३५ - ५०
पिंपरी ते नळस्टॉप - ३० - ४०
रामवाडी ते नळस्टॉप - २५ - ५०
----------
मेट्रो प्रवासी संख्या
मार्ग - मे - जून
पिंपरी ते स्वारगेट - ६,७८,८५२ - ७,३६,५०५
वनाज ते रामवाडी - ८,१४,५४१ - ८,९३,३३७
एकूण - १४,९३,३९३ - १६,२९,८४२
(आकडेवारी कालावधी : एक ते दहा तारीख)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Mumbai Expressway Accident : सीएनजी लिक होऊन धावती कार पेटली; वैष्णोदेवी दर्शनाहून परतणाऱ्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

IPL 2026 : दोन मॅच, जिथे मुबंई इंडियन्सने माती खाल्ली! R Ashwin ने पोलखोल केली; म्हणाला, आता सर्व ६ सामने जिंकणे अशक्य

Latest Marathi News Live Update : राज्यभरात उष्माघाताच्या 115 रुग्णांची नोंद

CBSE Parenting Calendar 2026-27: मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नवा उपक्रम; सुजाण पालकत्वासाठी 'सीबीएसई'कडून पालकांसाठी मार्गदर्शक दिनदर्शिका जाहीर

Gold Rate Today: एप्रिलमध्ये सोनं स्थिर! आता महागणार का? खरेदीदारांनी काय करावं?

SCROLL FOR NEXT