सोमाटणे, ता. १६ ः पवन मावळात पडत असलेल्या जोरदार पावसाने आढले, पुसाणे, कासारसाई धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून, साळुंब्रे पूल पाण्याखाली गेला आहे.
पवन मावळात आज पाचव्या दिवशीही संततधार पाऊस सुरु असून, आज मध्यरात्री पावसाचा जोर आणखी वाढला. या पावसाने पवना, कासारसाई, आढले नद्यांना पूर आला आहे. या पुरामुळे रविवारी मध्यरात्रीपासून साळुंब्रे पूल पाण्याखाली गेला. सध्या पुलावरून पाणी वाहत असल्याने साळुंबे, गहुंजे मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला. आढले नदीला आलेल्या पुरामुळे आढले धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली. कासारसाई नदीला आलेल्या पुरामुळे पुसाणे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, धरणाच्या सांडव्यातून पाणी वाहत आहे. पुसाणे धरणातून वाहत असलेल्या जोरदार पाण्यामुळे कासारसाई धरणाच्या पाणीपातळीत तीन टक्क्यांनी वाढ झाली. सध्या धरणात
उपयुक्त पाणीसाठा ६. २२ दशलक्ष घनमीटर तर एकूण पाणीसाठा ७. ५४ दशलक्ष घनमीटर झाला आहे. धरण ३९ टक्के भरले, अशी माहिती शाखा अभियंता अमर धायगुडे यांनी दिली.
---------------------------------------------------------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.