पिंपरी-चिंचवड

शरद पवार यांची आज शहरात बैठक ताथवडेत विविध विषयांचा घेणार आढावा

CD

पिंपरी, ता. १६ ः पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधण्यासाठी शरद पवार उद्या (मंगळवारी) पिंपरी चिंचवडमध्ये बैठक घेणार आहेत. महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे. ताथवडेतील सिल्वर बॅंक्वेट हॉल येथे सकाळी अकराला होणाऱ्या बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे उपस्थित राहणार आहेत.
विधानसभा निवडणुकांनंतर पहिल्यांदाच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार पिंपरी चिंचवड शहरात येत आहेत. त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षामध्ये होणारे बदल, दिल्या जाणाऱ्या जबाबदाऱ्या या विषयी या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह शहरातील इतर पक्षांचेही लक्ष या बैठकीकडे लागले आहे. विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे मनोबल उंचावण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण असल्याने या बैठकी विषयीची उत्सुकता राजकीय वर्तुळामध्येही दिसून येत आहे.
-------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder Mystery: केतनच्या बहिणीनेच पकडला सियाचा खोटेपणा; अंत्यविधीनंतर आली होती भेटीसाठी, कुटुंब थेट पोलिस ठाण्यात

४,५०० वर्षे जुन्या मूर्तीला घातले कपडे ! NCERT च्या 'त्या' फोटोवरुन वाद; मूळ फोटो परत येणार का ?

प्रियकराच्या एका चुकीने सियाचा प्लॅन केला फेल; CCTVमध्ये पोलिसांना असं काय दिसलं? धक्कादायक माहिती समोर

Maharashtra Weather: मान्सूनने महाराष्ट्र व्यापला! सर्वदूर पावसाची शक्यता; १० जिल्ह्यांत मुसळधार, तर १५ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Cow Urine for Chikungunya: चिकनगुनियावर गोमूत्र प्रभावी ठरू शकतं? IIT रुडकीच्या संशोधनात आश्चर्यकारक दावा समोर

SCROLL FOR NEXT