पिंपरी-चिंचवड

शहरात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार

CD

पिंपरी, ता. १६ ः पिंपरी चिंचवड शहरासह उपनगरात सलग दोन दिवस मुसळधार पावसाची नोंद झाली. सोमवारी सकाळी नऊपर्यंत शहरात २८ मिलिमीटर; तर सायंकाळी सहापर्यंत ९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. घाटमाथ्यावर देखील मुसळधार पाऊस पडल्यामुळे इंद्रायणी, पवना आणि मुळा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
पिंपरी चिंचवड शहराला यंदा पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. मे महिन्यात मॉन्सूनपूर्व पावसाची पावसाची विक्रमी नोंद झाली. यंदा मॉन्सूनचे आगमनही सुमारे पंधरा दिवस अगोदर झाले. शहरात २६ मे रोजीच मॉन्सूनचे आगमन झाले. मॉन्सूनच्या पहिल्याच पावसात शहरातील सखल भागांत, भुयारी मार्गांत आणि इमारतींच्या वाहनतळांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अचानक येत असलेल्या पावसामुळे नागरिकांना मे महिन्यातच रेनकोट, छत्री घेऊन बाहेर पडावे लागत होते. शहरात जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुसळधार पावसाची नोंद झाली. मात्र, त्यानंतर पावसाने उघडीप घेतली. शहरात दुपारी कडाक्याचे ऊन पडत होते. त्यामुळे तापमानाचा पारा देखील वाढला होता. पण, आता पुन्हा एकदा मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे किमान आणि कमाल तापमानात घट झाली आहे. आकुर्डी, हिंजवडीसह अनेक भागांत पाणी साचल्यामुळे नागरिकांना पाण्यातून वाट काढणे कठीण होत होते. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या देखील भेडसावत होती. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. रविवारी रात्री अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला. सोमवारी सकाळीही मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. घाटमाथ्यासह पुणे जिल्ह्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT