पिंपरी-चिंचवड

भगवद्गीता प्रज्ञा शोध परीक्षेत ३,५०० विद्यार्थ्यांचा सहभाग

CD

भगवद्गीता प्रज्ञा शोध परीक्षेत ३,५०० विद्यार्थ्यांचा सहभाग

पिंपरी, ता. २५ : भगवद्गीता प्रज्ञा शोध परीक्षेत शहरातील ३५ शाळांच्या ३,५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यातील १४० गुणवंतांचा पारितोषिक वितरण सोहळा ग. दि. माडगुळकर नाट्यगृह, आकुर्डी, प्राधिकरण येथे पार पडला.
हा उपक्रम रावेत येथील ईस्कानच्या ‘गोविंदधाम’तर्फे आयोजित करण्यात आला. कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून बजाज ऑटोचे राम तिलक, ऑटोलाइन इंडस्ट्रिजचे शिवाजी आखाडे, रोहिणीकुमार प्रभु, गोपती प्रभु आणि जगदीश गौरांग प्रभु उपस्थित होते.
ही परीक्षा इयत्ता पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी या दोन गटांत पार पडली. पहिल्या गटात कार्तिक सुळे, राणी बिरादार, प्रज्ञा मेंगडे यांच्यासह दुसऱ्या गटात कार्तिक मुसळे, शर्वरी गुर्जर, अक्षरा जगदाळे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. भगवद्गीतेवरील या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आध्यात्मिक तसेच नैतिक मूल्ये रुजवण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी आदर्श मुख्याध्यापक पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime : विधानभवनाबाहेर तरूणाचा आत्मदहनाचा प्रयत्न, अंगावर रॉकेल ओतून घेतले अन्... पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

Latest Marathi News Live Update : व्यावसायिक गॅसचा फटका शिवभोजन थाळीला; एक दिवस पुरेल इतकाच व्यावसायिक सिलेंडर; दरही वाढले

सूर्यकुमार यादवचं 'Olympics Gold' लक्ष्य; गौतम गंभीरचे धक्कादायक विधान, भारतीय चाहत्यांची चिंता वाढवणारी गोष्ट

सिग्नल तोडला अन् पूजा सावंतला पोलिसांनी पकडलं; आयडीवरचं आडनाव वाचताच... अभिनेत्रीने सांगितला किस्सा

India Captain: संजू सॅमसन होणार भारतीय संघाचा कर्णधार? सूर्यकुमार यादवनंतर T20 तील नेतृत्वाबाबत चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT