पिंपरी-चिंचवड

रेल्वे स्थानकांची स्थिती ‘बकाल’

CD

अविनाश ढगे ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ११ ः स्वच्छतेचा अभाव, अपुरी बैठक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची वानवा, मद्यपी, भिकाऱ्यांचा वावर, सुरक्षा व्यवस्थेचे ‘तीन-तेरा’...ही स्थिती आहे, पुणे ते लोणावळा दरम्यानच्या रेल्वे स्थानकांची. सकाळच्या प्रतिनिधींनी केलेल्या पाहणीत हे वास्तव समोर आले आहेत. पुणे ते लोणावळा दरम्यानच्या ६४.४ किलोमीटर अंतरात १७ रेल्वे स्थानकांचा समावेश असून, येथे दररोज लोकलच्या ४२ फेऱ्या होतात. या सर्व अविधांमुळे हजारो प्रवाशांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.

रेल्वेच्या मालमत्तेचे संरक्षण करणे, प्रवाशांची आणि स्थानकाची सुरक्षा करण्याची जबाबदारी रेल्वे पोलिस दलाच्या जवानांवर आहे. पण, आकुर्डीसह महत्त्वाच्या अनेक स्थानकांवरच हे जवान तैनात नाहीत. तर काही स्थानकात स्थानकात लोहमार्ग पोलिसही (जीआरपी) नाहीत. त्यामुळे स्थानकात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. मद्यपी, भिकारी यांचा मुक्तसंचार असल्याने प्रवासी महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्‍न‎ ऐरणीवर आला आहे. पुणे-लोणावळा मार्गावरील काही रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढविली आहे. पण, या ठिकाणी पत्राशेड उभारलेले नाहीत, बैठक व्यवस्था नाही. त्यामुळे प्रवाशांना उन्हात रेल्वेची वाट पाहत थांबावे लागते. काही रेल्वे स्थानकांवर तर स्वच्छतागृहच नाही. तर आहेत तेथे कुलूप लावण्यात आले आहे. त्यामुळे महिलांची कुचंबणा होते. रेल्वे प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. मात्र, अनेक रेल्वे स्थानकांत प्राथमिक सोयीसुविधा नसल्यामुळे बकालपणा आला आहे. पुणे-लोणावळा महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या लोहमार्गावरील स्थानकांची ही दयनीय अवस्था झाल्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. या परिस्थितीला जबाबदार कोण, असा प्रश्‍न प्रवाशांकडून विचारला जात आहे.

रेल्वे स्थानक - दैनंदिन प्रवासी संख्या
पुणे ः १,७३,३५६
शिवाजीनगर ः ७,९७२
खडकी ः ४,०१४
दापोडी ः १,९७३
कासारवाडी ः ३,१७९
पिंपरी ः ११,३६१
चिंचवड ः १०,२१७
आकुर्डी ः १८,४७५
देहूरोड ः ५,९७१
बेगडेवाडी ः १,०५३
घोरावाडी ः १,२७२
तळेगाव ः २३,२६३
वडगाव ः ३,६२९
कान्हे ः २,८२६
कामशेत ः ४,८०६
मळवली ः २,४२६
लोणावळा ः ३,४००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळणार! कधी अन् कुठे, IMDने तारीखच सांगितली

Zomato delivery boy accident: झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय मुसळधार पावसात पडला उघड्या गटारात अन् मग...

मुंबई-वडोदरा एक्सप्रेसवेचे काम अंतिम टप्प्यात, प्रवासात पाच तासांची बचत; कधीपासून होणार वाहतूक सुरु?

Mhada House: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! म्हाडाचे घर होणार आणखी स्वस्त, किती टक्क्यांनी घटणार; वाचा अहवाल

PM Modi and Zelenskyy : मोठी बातमी! आता मोदी अन् झेलेन्स्कींचीही झाली चर्चा; जाणून घ्या, कोण काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT