पिंपरी-चिंचवड

लोककलेला व्यासपीठ मिळवून द्यावी

CD

‘मराठी संमेलनात लोककलेला
व्यासपीठ मिळवून द्यावे’


पिंपरी, ता. ७ ः अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात लोककलेला (पोवाडा, भारुड, लावणी, गौळण,) व्यासपीठ मिळवून द्यावी, अशी मागणी कवयित्री सुनंदा शिंगनाथ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
अनेक वर्षांपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मराठीचा गौरव करण्याच्या हेतूने मराठी साहित्य महोत्सव प्रचंड मोठ्या प्रमाणात आयोजित केला जातो. यामध्ये विविध साहित्य प्रकारांना मानाचे स्थान दिले जाते. शिवाय विविध विषयावर परिसंवाद, कथाकथन, कवी संमेलन , कवीकट्टाचेही आयोजन केले जाते. यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक कवी कवयित्रींनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कविता सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. लोककला मात्र अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापासून वंचित आहे. जी लोककला महाराष्ट्राच्या साहित्यिक वैभवात अनेक शतकांपासून मोलाची भर घालत आहे, अशी लोककला ज्यामध्ये पोवाडे, भारुडे आहेत, महाराष्ट्राची शान असणारी आणि आपले वेगळेपण जपणारी लावणी आहे, गवळणी आहेत, तसेच लोककलेच्या अंगाने येणारी विविध साहित्य प्रकार असतात. परंतु याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. लोककलेची सन्मान आणि जपवणूक व्हावी आणि पोवाडे भारुडे लागले गवळण इत्यादी साहित्याची मोठ्या प्रमाणात निर्मिती होण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात लोकप्रिय व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेल दरवाढ, तुटवड्याने शेतकरी अडचणीत; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जागतिक संकट अन् मागणीही वाढलीय

MI vs RR: आधी आऊट, मग नो बॉल अन् चौकार... जडेजाने शार्दुल ठाकूरची भर मैदानात उडवली खिल्ली! Video होतोय Viral

Sangli Advocate Death : 'माझ्या मृत्यूला कोणालाही...'; मरण्यापूर्वी 27 वर्षीय वकिलाने चिठ्ठीत काय लिहिलं? सांगलीतील घटनेने खळबळ

आश्रम ३ मधील इंटीमेट सीनवर पहिल्यांदाच बोलला बॉबी देओल, म्हणाला, 'मी फार घाबरलो होतो'

विधानपरिषदेआधी काँग्रेसला धक्का? ७० नगरसेवक नॉट रिचेबल; राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT