पिंपरी-चिंचवड

बीआरटी स्थानकात कचऱ्याचे ढीग; दुर्गंधीमुळे प्रवासी हैराण

CD

पिंपरी, ता. २५ ः पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बीआरटी स्थानकात कचऱ्याचे ढीग साचले असून, परिसरात दुर्गंधी पसरली आहे. प्रवाशांना नाकाला रुमाल लावून बीआरटीतून बाहेर पडावे लागत आहे. याकडे पीएमपीएमएल आणि महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असून, बीआरटी स्थानके स्वच्छ करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
प्रवाशांना जलद प्रवास करता यावा, यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून मोठा खर्च करून पीएमपीएमएल बससाठी स्वतंत्र ‘बस रॅपिड ट्रान्झिट’ (बीआरटी) मार्गिका बांधण्यात आली. पिंपरी-चिंचवड शहरात निगडी ते दापोडी, सांगवी फाटा ते किवळे, नाशिक फाटा ते वाकड, दिघी ते आळंदी आणि चिखली ते काळेवाडी फाटा या मार्गांवर बीआरटी सुरू आहेत. पण, यांपैकी बहुतांश मार्गांवरील बीआरटी स्थानकांची दुरवस्था झाली आहे. बीआरटी स्थानके स्वच्छ करण्याची जबाबदारी असलेले पीएमपीएमएलचे कर्मचारी कचरा गोळा करण्याऐवजी तो कचरा रस्त्यावर किंवा बाजूला ढकलून देतात. त्यामुळे बीआरटी स्थानकाच्या आजूबाजूला कचऱ्याचे ढीग जमा होत आहेत. त्यामुळे बीआरटी स्थानकात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. बीआरटी स्थानकांच्या आजूबाजूला असलेले पथारीचालकही स्थानकाजवळील किंवा बीआरटी स्थानकातील बसवलेल्या कचरा कुंडीत कचरा टाकतात. परिणामी, कचरा कुंडी भरल्यानंतर हा कचरा बाहेर पडून रस्त्यावर येतो. महापालिकेचा आरोग्य विभाग हा कचरा संकलन करत नसल्याने दिवसेंदिवस यात वाढ होत आहे. बीआरटी स्थानकात ये-जा करणाऱ्या प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. शहरातील बहुतांश बीआरटी स्थानकांत हीच परिस्थिती आहे.

‘‘निगडी बीआरटी स्थानकामागे कचरा जमा झाला आहे. त्यामुळे बीआरटी स्थानकात दुर्गंधी पसरली आहे. बीआरटीतून बाहेर पडल्यानंतरदेखील त्या मार्गावर कचरा पडलेला असतो.
- राहुल शिंदे, प्रवासी

‘‘बीआरटी स्थानके स्वच्छ करण्याची जबाबदारी पीएमपीएमएलची आहे. मात्र, तेथील कचरा संकलन करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. बीआरटी स्थानके अस्वच्छ असतील तर संबंधित डेपो मॅनेजरला सूचना देण्यात येतील.
- सुभाष गायकवाड, विभाग प्रमुख, पीएमपीएमएल

दृष्टिक्षेपात बीआरटी...
मार्ग - ५
किलोमीटर - ५०.५
एकूण थांबे - ९२
धावणाऱ्या बस - ४११
------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT