पिंपरी-चिंचवड

अल्पवयीन आरोपीसह सोनसाखळी चोर अटकेत

CD

पिंपरी, ता. १३ : रावेत पोलिसांच्या पथकाने एका अल्पवयीन आरोपीसह एका सराईत सोनसाखळी चोराला अटक केली. बालाजी राजू उमाप (वय २०, रा. गुलटेकडी, पुणे) असे आरोपीचे नावे आहेत. याशिवाय पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले.
यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील चार, तर पुणे शहर हद्दीतील दोन असे एकूण सहा गुन्हे उघडकीस आले. चोरीचा माल घेणाऱ्यालाही अटक करण्यात आली. यश हरीश खर्डेकर (वय २४, रा. शिवदर्शन रोड, मुक्तांगण शाळेजवळ, पुणे) असे आरोपीचे नाव आहे.
रावेतमधील एका गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी ही कारवाई केली. सागर शाम इटकर (रा. विकास नगर, किवळे) हे २७ जुलैला रात्री साडे आठच्या सुमारास दुचाकीवरून एस. बी. पाटील मार्गावरून होते. त्यावेळी दुचाकीवरील चोरट्यांनी त्यांना अडविले. त्यांना शिवीगाळ करून धमकी देत त्यांच्या गळ्यातील २.३ तोळे वजनाची सोनसाखळी हिसकावून दोघे पसार झाले. तपासात पोलिसांनी उमाप व अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्यांनी खर्डेकरला मुद्देमाल विकल्याचे सांगितले. या आरोपींकडून रावेत, चिखली, भोसरी, एमआयडीसी भोसरी पोलिस या ठाण्यांच्या हद्दीतील सोनसाखळी चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले. याशिवाय विश्रांतवाडी व विमानतळ पोलिस ठाण्यातील दोन गुन्हेही उघडकीस आले.
या कारवाईत पोलिसांनी दोन लाख ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व सत्तर हजार रुपये किमतीची एक दुचाकी असा एकूण तीन लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
-------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: 'सातारा जिल्ह्यातील आशिष महांगरे बनला संशाेधक'; जिद्दीच्या बळावर यशाला गवसणी, जर्मनीत करणार संशोधन

Pune : जिम ट्रेनर तरुणीने दुकानाच्या दारातच केली तरुणाची हत्या, घटनेनंतर स्वत: पोलिसात हजर; मित्रासह दोघांना अटक

Pakistan Independence Day : पाकिस्तानात स्वातंत्र्यदिनीच पसरली शोककळा, हवेत गोळीबारात चिमुकलीसह ३ ठार, ६५ गंभीर जखमी

Chh. Sambhajinagar: “मैं जा रहा हूँ” असा मेसेज पाठवून २३ वर्षीय युवकाने संपवले जीवन; वाळूज एमआयडीसी परिसर हादरला

Satara News: अकरावी प्रवेशासाठी आता ‘विशेष फेरी’; मंगळवारपासून प्रवेश निश्‍चित करता येणार, सुधारित वेळापत्रक जाहीर

SCROLL FOR NEXT