पिंपरी-चिंचवड

गुन्हे वृत्त

CD

कंपनीच्या गोपनीय माहितीची
चोरी; चौघांवर गुन्हा दाखल
पिंपरी : कंपनीचे गोपनीय सोर्स कोड आणि सॉफ्टवेअर सोल्यूशन चोरून नवीन कंपनी स्थापन करून ८२ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार हिंजवडी येथील फ्युचरिइम टेक्नॉलॉजीज प्रा. लि. कंपनीत घडली.
बिश्वजीत मिश्रा (वय ४५, रा. बाणेर, पुणे), नयुम शेख (वय ४२, रा. कोंढवा, पुणे), सागर विष्णू (वय ३९, रा. रहाटणी, पुणे) आणि एका महिला अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी दत्तात्रेय प्रभाकर काळे (रा. थेरगाव, पुणे) यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी संगनमत करून कंपनीसोबत केलेल्या कराराचा भंग केला. फिर्यादीच्या कंपनीतील गोपनीय आणि कॉपीराइट संरक्षित सोर्स कोड व सॉफ्टवेअर सोल्यूशनची चोरी केली. बेकायदा विकसित केलेल्या वेबसाइटचा मोबदला, अपॉर्च्युनिटी लॉस आणि इतर सेवांच्या माध्यमातून कंपनीचे अंदाजे ८२ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान केले आहे. आरोपींनी नवीन कंपनी स्थापन करून स्वतःच्या फायद्यासाठी फिर्यादीच्या कंपनीतील सॉफ्टवेअर सोल्यूशन आणि सोर्स कोडचा वापर केला.

तरुणावर कोयत्याने वार; एकाला अटक
पिंपरी : तरुणावर कोयत्याने वार केल्याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथे घडली. या प्रकरणी अमोल पांडुरंग शिंदे (रा. रावेत) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विकास प्रल्हाद शिंदे (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) याला अटक केली आहे. फिर्यादीचा भाऊ अजिनाथ शिंदे आणि त्याची पत्नी भाजी खरेदी करत असताना, आरोपी विकास शिंदे याने जुन्या व्यवहारावरून त्यांच्यासोबत वाद घातला आणि शिवीगाळ केली. त्यानंतर रात्री आरोपीने त्याची रिक्षा फिर्यादीच्या मोटारी समोर लावून फिर्यादीच्या हातावर वार करून जखमी केले.

मेफेड्रॉन प्रकरणी दोघांना अटक
पिंपरी : मेफेड्रॉन (एमडी) या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोघांना भोसरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी ६८ हजार रुपये किमतीचा मेफेड्रॉन आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई भोसरी येथील पुणे-नाशिक महामार्गावर करण्यात आली.
मेहबूब चाँद शेख (वय २५, रा. कोंढवा खुर्द, पुणे) आणि नासिर चाँद शेख (वय २७, रा. कासारवाडी, पुणे) अशी अटक केलेल्यांची
नावे आहेत.


मोशीत ७८ हजार रुपयांचे अफिम जप्त, एकाला अटक
पिंपरी : विक्रीसाठी अफिम बाळगल्याप्रकरणी एकाला पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई मोशीतील बोऱ्हाडेवाडी येथे करण्यात आली. ओमाराम वेनाराम देवासी (वय २४, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी, मूळ- राजस्थान) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी ओमाराम देवासी त्याच्या मोटारीत ७८ हजार रुपये किमतीचा १०२ ग्रॅम वजनाचा अफिम बाळगला होता. त्याच्याकडून अफिम आणि मोटार असा एकूण ३ लाख ७८ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

ई मेल हॅक करून कंपनीची फसवणूक
पिंपरी : एका कंपनीतील कर्मचाऱ्याचा अज्ञात व्यक्तीने ईमेल हॅक करून व्हेंडरची माहिती चोरली. बनावट बँक खात्याची माहिती पुरवून कंपनीची १.३९ कोटी रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार चाकण येथील एनझेन बायोसायन्सेस लि. या कंपनीत घडला. याप्रकरणी एका महिलेने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल आहे. अज्ञात व्यक्तीने ‘एनझेन’ कंपनीतील कर्मचाऱ्याचा ईमेल आयडी हॅक करून, व्हेंडरची माहिती चोरली. त्याने बनावट बँक खात्याची माहिती ईमेलद्वारे पुरवली आणि इनबॉक्समधील तसेच डिलीट केलेल्या ईमेलची चोरी केली. या आधारावर, व्हेंडरशी साधर्म्य असलेल्या बनावट डोमेन आणि ईमेल आयडीचा वापर करून बँक खात्याची माहिती बदलली. जेव्हा कंपनीच्या अकाउंट पेएबल टीमने या बनावट खात्यावर पेमेंट सुरू केले, तेव्हा अज्ञात व्यक्तीने स्वतःसाठी रक्कम घेऊन कंपनीची एक कोटी ३९ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मुंबईत घुसणार; आता हटणार नाही! जे व्हायचे ते होऊन जाऊ द्या

Eknath Shinde यांच्या बंगल्यावर मोठी खलबतं, भाजप प्रदेशाध्यक्षांच्या संपर्कात असणाऱ्या नगरसेवकांना तंबी, काय निर्णय घेणार?

India Ultimatum Pakistan: ‘..तर परिणाम वाईट असतील' ; चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या पाकिस्तानला भारताचा अल्टिमेट!

Manoj Jarange Patil: जरांगे-सरनाईक भेटीत काय चर्चा झाली? मराठा आरक्षणाचा प्रश्न कसा सुटणार? स्पष्ट सांगितलं

Manchar News : साकारमाच-आहुपे गाव पुनर्वसनाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT