किडीकव्ह प्री-स्कूल
चिंचवड येथील शाहू नगर येथील किडीकव्ह प्री-स्कूलमध्ये पिंपरी चिंचवड विभागात शैक्षणिक गुणवत्तासह वृक्ष लागवडीनिमित्त बीजमाता राहीबाई पोपेरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पोपेरे यांनी शाळेची शैक्षणिक गुणवत्ता तसेच पर्यावरण संदर्भात राबविण्यात येणारे उपक्रमाची पाहणी केली. सहप्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देवा तांबे उपस्थित होते. यावेळी पर्यावरण संस्थेच्या महाराष्ट्र राज्य महिला सल्लागार अंजुताई सोनवणे, अनघा दिवाकर आदी उपस्थित होते. शाळेच्या दशकपूर्ती सोहळ्याची सुरुवात वृक्षदिंडीने पर्यावरण संरक्षण, प्रदूषण नियंत्रण, वृक्षारोपण यावर घोषणा देत करण्यात आली. या दिंडीमध्ये विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने सहभागी होते. मुख्याध्यापिका नेहा दुग्गल व शमा राका यांना राहीबाई पोपेरे यांच्या हस्ते राष्ट्रीय आदर्श शिक्षिका या पुरस्काराने व शाळेस राष्ट्रीय आदर्श शाळा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी पोपेरे यांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पालक व विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात कढीपत्ता, पपई, अडुळसा, इन्सुलिन, अश्वगंधा, कोरफड, तुळस अशा एकूण १७० औषधी वनस्पतीचे रोपण केले.
जयश्री दिलीप निंबारकर प्राथमिक शाळा
चिंचवड (मोहननगर) येथील सौ. जयश्री दिलीप निंबारकर प्राथमिक विद्यालय, सरकारमान्य माध्यमिक विद्यालय आणि मातोश्री ताराबाई निंबारकर पूर्व प्राथमिक विद्यालय या ठिकाणी स्प्रॉग हब फाउंडेशन यांच्या सहकार्यांनी आकाश कंदील बनवणे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयातील सुमारे ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सर्व विद्यार्थ्यांनी आकर्षक आकाशकंदील तयार केले. यावेळी स्प्रॉग हब फाउंडेशनच्या वतीने सचिव शैव्या मेहरा, मार्गदर्शिका पूजा जैन, चार्वी जाधव, श्रावणी सावंत, लब्धी जैन आणि मुख्याध्यापिका स्नेहल पारखे, सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. नियोजन संस्थेच्या अध्यक्षा जयश्री निंबारकर यांनी केले होते.
सरस्वती विश्वविद्यालय नॅशनल स्कूल
विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्था, पुणे जिल्हा यांच्या वतीने सरस्वती विश्व विद्यालय नॅशनल स्कुलला ‘पुणे जिल्हा शिक्षण पुरस्कार -२०२५’ देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते संस्थेचे संचालक विश्वनाथन नायर, सरस्वती नायर, मुख्याध्यापिका डॉ. क्षमा गर्गे, आणि पालक प्रतिनिधी अश्विन काळे यांनी स्वीकारला.
सरस्वती प्राथमिक विद्यालय
आकुर्डी येथील सरस्वती प्राथमिक विद्यालय शाळेत शिशुवर्ग व बालवर्ग पालकसभा तसेच रांगोळी कार्यशाळा संस्थेचे संस्थापक सचिव गोविंद दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. लहान मुलांचे संगोपन कसे करायचे? त्यांना कसे बोलते करायचे? त्यांना बडबडगीते, कथा कोणत्या पद्धतीने शिकवायच्या? याबाबत दाभाडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच दिवाळीच्या सणानिमित्त महिला पालकांना वेगवेगळ्या रांगोळ्या काढता याव्यात, यासाठी शिक्षिका सारिका आस्मर, प्रतिमा काळे यांनी ओएचपी शीटवर रांगोळी कशी काढायची? याबाबत कृतीतून मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत एकूण ५० महिला पालकांनी आनंदाने, उत्साहाने सहभाग घेतला. प्रास्ताविक शांता हारळे यांनी केले. प्रकाश कोळप यांनी संगीतमय साथ दिली. स्वाती जाधव यांनी आभार मानले.
जिजामाता हायस्कूल
जिजामाता हायस्कूल भोसरी येथे आदर्श अभ्यास मोबाईल अॅप वितरण केले. रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी यांच्या हस्ते हस्तांतरण करण्यात आले. प्रमुख पाहुणे रो. डॉ. संतोष मोरे (रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी अध्यक्ष), डॉ. योगेश गाडेकर (सचिव), दीपक सोनवणे (माजी अध्यक्ष), सुनील पाटे पाटील, अण्णा मटाले (पर्यावरण संचालक), डॉ. अविनाश तळोले (सदस्य), अमित कुलकर्णी (सचिव), मुख्याध्यापक नीलेश गायकवाड उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.