पिंपरी-चिंचवड

आळंदीतील सिद्धबेटात वृक्षारोपण

CD

(अजिंक्य डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग)
अजिंक्य डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आळंदी सिद्धबेट परिसरामध्ये अजिंक्य वन महोत्सव अभियानांतर्गत वृक्षारोपण केले. अजिंक्य डी. वाय. पाटील समुहाच्या कार्यकारी उपाध्यक्ष डॉ. कमलजीत कौर व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. फारूक सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आंबा, चिंच, जांभूळ, पिंपळ, उंबर, बेल, कडूलिंब अशा विविध ९० प्रजातींच्या वृक्षांची लागवड केली. श्रमसंस्कार शिबिरास डॉ. एस. एम. खैरनार, डॉ. पल्लवी खरात, डॉ. नीलेश माळी, डॉ. भाग्यश्री ढाकुलकर, डॉ. कांचन वैद्य, डॉ. जगन्नाथ गावंडे, अंतर्गत गुणवत्ता कक्ष समन्वयक प्रा. रियाज काझी, रजिस्ट्रार गोरखनाथ देशमुख, डॉ. नागेश शेळके, डॉ. प्रमोद वडते, अर्जुन मेदनकर आदींचे विशेष सहकार्य लाभले. वृक्षारोपण उपक्रम यशस्वितेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. दिलीप घुले व सर्व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. वृक्षारोपण करताना आपल्या भागात वाढणारी, सावली देणारी, पक्ष्यांना घरटी बांधता यावीत, अन्नपाणी मिळावे, अशीच म्हणजे भारतीय प्रजातींच्या झाडांची लागवड करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन संस्थेच्या कार्यकारी उपाध्यक्ष डॉ. कौर यांनी केले. पर्यावरण समतोल व संवर्धनासाठी केलेल्या अभिनव उपक्रमाबद्दल महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे त्यांनी विशेष कौतुक केले.
(59653)

मराठीचा गौरव आणि ‘एआय’
- नेहा वडगावे (आयआयसीएमआर)
आयआयसीएमआरच्या ज्ञानकेंद्रात अभिजात मराठी भाषा दिन आणि अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात साजरे केले. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल आदर, संस्कृतीची जाण, वाचनाची आवड आणि भाषिक वारसा जपण्याची प्रेरणा निर्माण करणे हा होता. पुस्तक प्रदर्शनाचे उद्‍घाटन संस्थेचे संचालक डॉ. अभय कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. लेखक जयप्रकाश झेंडे प्रमुख पाहुणे होते. त्यांच्या २६व्या पुस्तकाच्या प्रकाशनाची घोषणा केली. त्यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेतील सृजनशीलतेबद्दल मार्गदर्शन केले आणि भाषेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. बिझनेस प्रोसेस एक्सलन्स २०२५ अंतर्गत ‘एआय ड्रिव्हन बिझनेस प्रोसेस इवोल्युशन’ कार्यक्रम झाला. व्यवसाय प्रक्रियांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका यावर पराग औटी आणि अमित तलवार यांनी मार्गदर्शन केले. डॉ. सरिता सॅमसन आणि डॉ. राजेंद्र आगवणे यांनी समन्वय साधला. सुनील माणिकाणी, विवेक सोनार आणि विक्रम दुसाणे यांनी ‘स्मार्ट बिझनेस स्मार्टर प्रोसेस ः कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे रूपांतरण विषयावर मत मांडले. जयप्रकाश झेंडे लिखित ‘भारतीय उद्योग पर्वातील कर्मयोगी रतन टाटा’ पुस्तकाचे प्रकाशन झाले. ‘कॉफी विथ कॉर्पोरेट’ सत्रात डॉ. जितेंद्र जोशी यांनी ‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात मानवी अस्तित्वाचे महत्त्व’ विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेच्या गौरवाबरोबरच, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व्यवसाय रूपांतरणाचे महत्त्व अधोरेखित केले.
(59651)

‘लिंक्डइन प्रोफाईल बिल्डिंग’चे धडे
(मराठवाडा मित्रमंडळ पॉलिटेक्निक)
एम. एम. पॉलिटेक्निकच्या संगणक विभागातर्फे आरआय टेक्नॉलॉजीजचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक रितेश शर्मा यांचे ‘लिंक्डइन प्रोफाइल बिल्डिंग’ विषयावर व्याख्यान झाले. व्यावसायिक ब्रँड तयार करण्यासाठी मजबूत लिंक्डइन प्रोफाईल तयार करणे आणि राखणे किती महत्त्वाचे आहे, यावर भर दिला. रितेश शर्मा यांनी डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी नेटवर्किंग संधी, इंटर्नशिप आणि नोकरीच्या संधींसाठी चांगल्या प्रकारे तयार केलेले लिंक्डइन प्रोफाईल कसे उपयुक्त ठरू शकते; प्रोफाईल ऑप्टिमायझेशन, कंटेंट निर्मिती आणि तंत्रज्ञान उद्योगात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या प्रभावी ऑनलाइन नेटवर्किंग धोरणांबद्दल व्यावहारिक टिप्स शेअर केल्या. संगणक विभागातील डिप्लोमा विद्यार्थ्यांनी सक्रियपणे चर्चा करत डिजिटल उपस्थिती वाढविण्याचे धडे घेतले. विद्यार्थ्यांना करिअर विकासासाठी सक्रिय पावले उचलण्यास प्रोत्साहन मिळाले. ‘‘आजच्या स्पर्धात्मक जगात, शैक्षणिक उत्कृष्टतेइतकेच ऑनलाइन उपस्थितीदेखील महत्त्वाची आहे. लिंक्डइन सारखे प्लॅटफॉर्म विद्यार्थ्यांना कनेक्ट होण्याची, शिकण्याची आणि व्यावसायिकदृष्ट्या वाढण्याची उत्तम संधी देतात,’’ असे संगणक शाखा विभागप्रमुख विकास सोळंके यांनी सांगितले.
(59652)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tej Pratap Yadav on Bihar Assembly Election : अखेर तेजप्रताप यादव यांनी बिहार विधानसभा लढवण्यासाठी मतदारसंघ केला जाहीर!

Kannad News : कन्नड तालुक्यातील ८ जिल्हा परिषद गटाचे, तर १६ पंचायत समिती गणाचे आरक्षण जाहीर

Latest Marathi News Live Update:मैनपुरी येथील एका गोदामात आग लागली

स्वतः उपाशी राहून मुलाला जेवण भरवत होती गिरीजा ओक; सासूबाई आल्या आणि...

Baramati News : तर दोन हजार वाहनांसह बारामतीचा चक्का जाम करणार; हायवा संघटनेचा प्रशासनाला इशारा

SCROLL FOR NEXT