पिंपरी-चिंचवड

भेसळखोरांवर ‘एफडीए’ची करडी नजर

CD

पिंपरी, ता. १३ : दिवाळीमध्ये भेसळयुक्त पदार्थांची विक्री टाळली जावी, यासाठी अन्न व औषध (एफडीआय) प्रशासनाने दुकाने आणि मिठाई विक्रेत्यांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. निकृष्ट दर्जाचे पदार्थ आढळल्यास विक्रेत्यांवर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. ग्राहकांनीही पदार्थ खरेदी करताना तपासून घ्यावीत, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.
दिवाळीमध्ये मिठाई, गोड-धोड पदार्थांना मोठी मागणी असते. त्यात प्रामुख्याने तूप, तेल, वनस्पती तूप, दूध, गूळ, रवा, खवा आदींचा उपयोग विविध पदार्थांचा वापर केला जातो. या पदार्थांना मागणी जास्त असल्यामुळे अनेक विक्रेते यामध्ये भेसळ करून विक्री करतात. मिठाईसह दुग्धजन्य पदार्थांमध्येही भेसळीचे प्रकार यापूर्वी समोर आले आहेत. यातून मानवी आरोग्याला अपाय होतो. त्यामुळे प्रशासनाकडून ही तपासणी केली जाते. संशयास्पद नमुने तपासणीसाठी पाठवून अहवाल आल्यावर त्यांच्यावर कारवाई केली जाते.

येथे करा तक्रार
अन्न पदार्थांमध्ये भेसळ किंवा अन्य संशय असल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १८००-२२२-३६५ या क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन ‘एफडीए’ प्रशासनाने केले आहे.

- ग्राहकांनो, काळजी घ्या
प्रत्येक खाद्यपदार्थांच्या आवरणावर ‘बेस्ट बिफोर’ तपासूनच खरेदी करावी.
‘बेस्ट बिफोर’चा उल्लेख नसेल, तर अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करावी
अधिकृत विक्रेत्यांकडूनच खाद्य पदार्थ घ्यावेत
खाद्यपदार्थ खरेदीचे बिल घ्यावे
नाशवंत पदार्थांचा लवकरात लवकर वापर करावा
नाशवंत पदार्थ थंड ठिकाणी ठेवावेत

अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडून त्यांच्या कार्यक्षेत्रातील अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांवर धाडी टाकून भेसळयुक्त पदार्थ जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. कमी दर्जाचे आणि असुरक्षित अन्नपदार्थ आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
- सुरेश अन्नपुरे, सहआयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT