सृष्टी चौकात धोकादायक खड्डा
पिंपळे गुरव येथील सृष्टी चौकात लावलेले ब्लॉक निघाले असून तेथे खड्डा पडला आहे. हा चौक वर्दळीचा आहे. तो खड्डा वाचवून पुढे जाण्याच्या नादात दुचाकी वाहने घसरून पडत आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. महानगरपालिकेने लवकरच तेथील खड्डा बुजवून नवीन ब्लॉक बसवावेत.
- नितीन सोनवणे, पिंपळे गुरव
PNE25V59856
नवभारतनगर येथे अशुद्ध पाणीपुरवठा
दापोडीतील पवार वस्ती येथील नवभारतनगरमध्ये अशुद्ध पिण्याचे पाणी येत आहे. पवार वस्तीतील विठ्ठल मंदिरा समोरील रस्त्यावर सांडपाणी वाहिनी तुडुंब भरल्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
- अकील शेख, पवार वस्ती दापोडी
PNE25V59855
आकुर्डी मंडई पुन्हा अस्वच्छ
आकुर्डी येथील श्री खंडेराया भाजी मंडईसमोरील वाहनतळाच्या अस्वच्छतेबद्दल काही दिवसांपूर्वी लिहिले होते. त्यानंतर त्याची दखल घेऊन संबंधित विभागाने तेथे स्वच्छता करून संपूर्ण परिसरात काँक्रिटीकरण केले. त्यानंतर, काही दिवस स्वच्छता दिसली. परंतु आता पुन्हा या परिसरात पूर्वीप्रमाणेच अस्वच्छता झाली आहे. प्रशासनाने सुधारणा केल्यानंतर तेथे स्वच्छता राखण्याची जबाबदारी भाजीवाले आणि नागरिकांची आहे. नागरिकांना स्वयंशिस्तीचे महत्व कधी कळणार?
- शिवराम वैद्य, निगडी
PNE25V59854, PNE25V59853
उघडा डीपी धोकादायक
निगडीमधील सिद्धिविनायकनगरी येथे कावेरी ‘जी’ इमारतीजवळ महावितरणचा डीपी धोकादायक पद्धतीने उघड्या अवस्थेत आहेत. लहान मुले येथे खेळत असतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. संबंधित प्रशासनाने याठिकाणी योग्य उपाययोजना करावी.
- सिराज बशीर शेख
PNE25V59858
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.