‘वर्तमाना’च्या प्रती; संसाराची प्रगती
वृत्तपत्र विक्रेते कुटुंबांच्या संघर्षातून उमललेल्या यशोगाथा
वर्तमानपत्रांनी इतिहास घडवला. स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतीची मशाल तेवत ठेवली. स्वातंत्र्यानंतर राज्यकर्त्यांवर वचक ठेवला. चांगल्या कामांचे कौतुकही केले. ज्ञानाचे दीप घरोघरी उजाळले. समाजप्रबोधन-परिवर्तन घडविले. आजही संगणक युगात, ‘एआय’च्या जमान्यात हे कार्य अविरतपणे वर्तमानपत्रांद्वारे सुरू आहे. सुख-दुःखाचे वृत्त घरोघरी पोहोचवत आहे. पण, त्यासाठीचा दुवा आहेत वृत्तपत्र विक्रेते बांधव. ऊन, पाऊस, वारा याची तमा न बाळगता, भल्या पहाटे उठून वाचकांपर्यंत त्यांच्या पसंतीचे वृत्तपत्र घरपोच देण्याचे काम हे बांधव करतात. आज वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त त्यांच्या कार्याला सलाम म्हणून त्यांची यशोगाथा मांडण्याचा प्रयत्न ‘सकाळ’ माध्यम समूहाने केला आहे.