वृत्तपत्र विक्रेता हे समाजातील बातमी वितरण साखळीतील शेवटचा; पण अत्यंत महत्त्वाचा दुवा आहेत. पहाटेच्या अंधारात, पाऊस-थंडी-वारा या सगळ्या अडचणींवर मात करून ते लोकांपर्यंत ज्ञान, माहिती पोहोचवतात. वृत्तपत्र विक्रेता दिन हा त्यांच्या समर्पणाचा, प्रामाणिक परिश्रमाचा आणि समाजावरील जबाबदारीच्या भावनेचा सन्मान करण्याचा दिवस आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरांतील आमचे अनेक ज्येष्ठ विक्रेते आजही निष्ठेने हे कार्य करत आहेत. त्यांना सन्मानित करणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. आजच्या डिजिटल युगातदेखील वृत्तपत्र विक्रेतेच ‘विश्वासार्ह बातमी’ जनतेच्या हातात पोहोचवतात. त्यांचा सन्मान म्हणजे वाचक आणि पत्रकार या दोघांच्या नात्याचा सन्मान आहे.
- विजय पारगे, अध्यक्ष, पुणे शहर वृत्रपत्र विक्रेता संघटना
PNE25V59999