पिंपरी-चिंचवड

विद्यार्थ्यांकडून योगासनांची स्वयंस्फूर्तीने प्रात्यक्षिके

CD

पिंपरी, ता.२१ ः ‘एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग’ या संकल्पनेवर आधारित यावर्षीचा जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. शहरासह परिसरातील विविध संस्था, संघटना तसेच शाळा व महाविद्यालयात योग शिबिर, योगासने प्रात्यक्षिक असे उपक्रम राबविण्यात आले. योग शिक्षिका यांनी आरोग्याच्यादृष्टीने योगाचे महत्त्व सांगितले. ताडासन, वृक्षासन, मकरासन आदी योग प्रात्यक्षिके प्रकार सादर केली. विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने योगासने केली.

जयवंत प्राथमिक शाळा
आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त भारतीय योग संस्थानतर्फे चिंचवड जिल्हा प्रमुख योग शिक्षक नामदेव तारू यांनी जयवंत प्राथमिक शाळेत योगाची प्रात्यक्षिके सादर केली व आरोग्याबद्दल मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका वंदना सावंत व सर्व शिक्षकवर्ग, विद्यार्थी यांनी योगाची प्रात्यक्षिके केली. कार्यक्रमाचे नियोजन जयश्री मोरे यांनी केले.

डॉ. डी. वाय. पाटील औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय
आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयात योग विद्या धामच्या योगाचार्य सुप्रिया बलकवडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी योगाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक फायदे समजावून सांगत विविध योगासने योग्य पद्धतीने करून घेतली. प्राचार्य डॉ. नीरज व्यवहारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. देवेंद्र शिरोडे, डॉ. आशिष कुलकर्णी, डॉ. आशिष चिंबाळकर, प्रा. तेजश्री देवकुळे, प्रा. ऐश्वर्या पाटील, अभिनव साळुंखे यांनी नियोजन केले.

श्री सरस्वती प्राथमिक विद्या मंदिर
आकुर्डीतील श्री सरस्वती प्राथमिक विद्या मंदिर शाळेमध्ये शिक्षक प्रकाश कोळप यांनी योगासनाचे प्रात्यक्षिके करून दाखवले. प्रियंका वालकोळी प्रास्ताविक केले. शाळेचे संस्थापक सचिव गोविंदराव दाभाडे यांनी मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक राजू माळे यांनी उपस्थिती लावली.

संत निरंकारी मिशन
संत निरंकारी मिशनच्यावतीने विविध शाखांमध्ये योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संत निरंकारी सत्संग भवनमध्ये साजरा करण्यात आला. यामध्ये २०० हून अधिक साधकांनी शिबिराचा लाभ घेतला. यामध्ये भोसरी परिसरातील जिजामाता शाळेतील १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूल
नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचे केवळ बौ‌द्धिकच नव्हे तर शारीरिक आणि मानसिक विकास साधावा, या हेतूने शाळेच्या मुख्याध्यापिका मृदुला गायकवाड यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमाला नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे, कार्यकारी संचालक विलास जेऊरकर, शाळा व्यवस्थापक डॉ. प्रिया गोरखे, तांत्रिक विभाग प्रमुख समीर जेऊरकर उपस्थित होते.

विश्वकर्मा मंदिर सेवाभावी ट्रस्ट
फेविकॉल चॅम्पियन क्लब व यमुनानगर येथील विश्वकर्मा मंदिर सेवाभावी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने यमुनानगर येथील विश्वकर्मा मंदिरात जागतिक योग दिन उत्साहात केला. संजय सुतार, सुखदा श्राध्दे यांनी योगाचे प्रात्यक्षिके केली. देविदास योगाबद्दल माहिती व महत्व सांगितले. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गजानन ढमाले उपस्थित होते.

योग विद्या धाम
पिंपरी चिंचवड महानगरपालिका व योग विद्या धाम, पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. हेडगेवार क्रीडा संकुल, मासुळकर कॉलनी, पिंपरी येथे सामूहिक योग सत्राचे आयोजन करण्यात आले. महापालिकेचे उपआयुक्त पंकज पाटील आणि सहाय्यक आयुक्त अतुल पाटील यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले. योग विद्या धाम संस्थेचे प्रमुख प्रमोद निफाडकर, राजीव गांधी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नलिनी जाधव, शिक्षिका वैशाली शेलार, क्रीडा प्रबोधिनी विद्यालयाचे मुख्याध्यापक जयराम वायळ, ऋषिकांत वचकल आदी यावेळी उपस्थित होते.

पथनाट्याद्वारे स्वच्छतेबाबत जनजागृती
स्वच्छता जनजागृतीसाठी पथनाट्य सादर करण्यात आले. ओला व सुका कचरा, घरगुती घातक व सॅनिटरी कचरा यांचे विलगीकरण, प्लास्टिक पिशवीच्या वापराचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम तसेच कापडी पिशवीचा पर्याय यावर विद्यार्थ्यांनी प्रभावी सादरीकरण केले.

फत्तेचंद जैन महाविद्यालय
श्री फत्तेचंद जैन महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून महाविद्यालयाच्या प्रांगणात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्याप्राचार्या सुनीता नवले, उपप्राचार्य अनिल गुंजाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

न्यू इंग्लिश स्कूल
राष्ट्रीय योग प्रशिक्षक साहिल गुंड यांनी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सुमारे एक तास विद्यार्थी व शिक्षक यांची योग प्रात्यक्षिके करून घेतली. पुणे विपश्यना समितीचे अरविंद ढवण हे उपस्थित होते. यावेळी क्रीडा प्रमुख गणेश शेंडगे यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य सतीश हाके यांनी शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापिका जयश्री लेंभे, सुनीता बारवकर, पर्यवेक्षिका प्रज्ञा गायकवाड उपस्थित होत्या. नीता शेटे यांनी सूत्रसंचालन केले. प्रवीण ढवळे यांनी आभार मानले.

राजमाता महाविद्यालय
उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राज्य शासन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व राजमाता कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ‘भक्तीयोग २०२५’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ.गणेश चव्हाण यांनी विविध योगासने, प्राणायाम व सूर्यनमस्कार आदींच्या प्रात्यक्षिकांमधून भक्ती व योग यांचा संगम साधला. संस्थेचे अध्यक्ष आमदार विलास लांडे यांनी ऑनलाइन पद्धतीने सहभाग घेऊन सर्वांना आरोग्यदायी आयुष्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त केली. डॉ. सुग्रीव आडाल, प्रा.अनिल गंभीरे यांनी नियोजन केले. प्रा. माधुरी चौधरी, प्रा. पूनम पाटील, आकाश साळी आदींनी संयोजन केले.


कै. सोपानराव विष्णु काळभोर माध्यमिक
पी. सी.एम.सी. पब्लिक स्कूल कै. सोपानराव विष्णु काळभोर माध्यमिक विद्यालय काळभोरनगर येथे झाले. योग विषयक प्रात्यक्षिके , , विविध योगासनांचे आरोग्यासाठी उपयोग यावर , मार्गदर्शन पर व्याख्यान, , अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मुख्याध्यापक एस.एन.केदार यांनी प्रास्ताविक केले. एम. आय.पठाण , व्हि.सी.पवार, एस. आर. खेडकर, यानीं कार्यक्रमाचे संयोजन केले. व्हि.एम.साळी , एस. एन.पवार विद्यार्थ्यांनी श्रृतिक्षा भगत यांनी योग प्रात्यक्षिके सादर केले. एस.एल.मेहेर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vice President Election : NDA चा ‘राजकीय डाव’! उपराष्ट्रपतीपदासाठी सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी, सध्या आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल

Pune Accident: दुर्दैवी घटना! 'ट्रक व टॅंकरच्या अपघातात एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू'; वर्षश्राद्धासाठी जाताना काळाचा घाला..

Asia Cup 2025: केएल राहुलची भारताच्या टी२० संघात का निवड होऊ शकत नाही? कारण आले समोर

Latest Marathi News Updates : भींत कोसळून तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

Crime: महाराष्ट्र हादरला! एकामागून एक ४ मुलांना विहिरीत फेकलं, वडिलांचं धक्कादायक कृत्य, संतापजनक कारण समोर

SCROLL FOR NEXT