पिंपरी, ता. २१ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त सदस्य निवडून आणण्यासाठी काँग्रेस पक्षाने नियोजन केले आहे. त्याप्रमाणे सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी सज्ज राहावे. प्रदेश स्तरावरून निरीक्षकांमार्फत व स्थानिक नेतृत्वात विश्वासात घेऊन उमेदवारीचा विचार केला जाईल, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.
मुंबई टिळक भवन येथे सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसची महानगरपालिका निवडणूक आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये शहर काँग्रेसमधील तिन्ही विधानसभानिहाय प्रत्येक प्रभागाची माहिती अध्यक्षांना देण्यात आली. शहर काँग्रेसच्या वतीने गेल्या तीन वर्षांमध्ये राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी घेतली.
‘‘२०१७ च्या प्रभाग रचनेनुसार ३२ प्रभाग व १२८ नगरसदस्य आहेत. या सर्व प्रभागांमध्ये बूथ स्तरावर मतदार नोंदणी करून काँग्रेस पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांनी शहर काँग्रेसच्या वतीने दिलेले उपक्रम राबवावे व तसेच महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात आंदोलने उभी करावीत,’’ अशा सूचना यावेळी करण्यात आली.
या बैठकीस प्रदेश उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील, माजी नगरसेवक बाबू नायर, अशोक मोरे, मनोज कांबळे, अभिमन्यू दहितुले, कौस्तुभ नवले, तुषार पाटील, मयूर जयस्वाल, ॲड. अनिरुद्ध कांबळे उपस्थित होते.
या बैठकीत पक्षाच्या आगामी रणनीतीवर सखोल चर्चा झाली. मतदार नोंदणी मोहिमेचे नियोजन, संघटनात्मक बांधणीचे मजबूतीकरण आणि प्रचार कार्यतंत्रात नवसंजीवनी देण्यासाठी विविध उपाययोजना सादर करण्यात आल्या. पक्षाच्या कार्यपद्धतीला अधिक प्रभावी करण्यासाठी अनेक सूचनांची देवाणघेवाण झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.