पिंपरी-चिंचवड

सकाळ संवाद

CD

पथदिवे सुरू करावेत
औंध-रावेत ‘बीआरटी’ मार्गावर अनेक बस थांबे आहेत, जसे की मुकाई चौक आणि किवळे टर्मिनल. हा मार्ग पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांना जोडतो आणि त्यावर ‘बीआरटी’ बस धावतात. पण, औंध-रावेत ‘बीआरटी’ मार्गावरील जिल्हा रुग्णालय ते रक्षक चौकादरम्यान एका ठिकाणी सलग दहा पथदिवे, तर दुसऱ्या ठिकाणी सलग पाच पथदिवे बंद अवस्थेत आहेत. तरी ते दिवे दुरुस्त करून नागरिकांची गैरसोय टाळावी.
- सनी शिंदे, पिंपळे निलख
PNE25V70800

पवना नदीपात्रात राडारोडा टाकण्याचे प्रकार
काळेवाडी (रागा पॅलेस) ते चिंचवड एम्पायर इस्टेट भागातील पवना नदीपात्रामध्ये रात्रीच्या वेळी राडारोडा टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. लक्ष्मीनगर, चिंचवडच्या मागील बाजूला, यशोपूरम आणि स्वामी समर्थनगर मागील बाजूला खासगी जागामालक आणि काही स्थानिक व्यावसायिक नदीपात्रात माती आणि राडारोडा टाकून भराव टाकत आहेत. ज्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे. यामुळे नदीतील सांडपाणी वाहिन्या बंद होऊन परिसरातील नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागते. नदीपात्रालगत मातीचा भराव टाकण्याचे काम खासगी जागामालकांकडून होत आहे. त्यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल करण्याबाबत बांधकाम परवानगी आणि अतिक्रमण नियंत्रण विभागाला सांगितले आहे.
- अमोल मळोडे, चिंचवडगाव
PNE25V70802

डीपी रस्ता पिंपळे निलख परिसरात पदपथाची दुर्दशा झाली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पदपथाचे काम दीड वर्षांपासून रखडल्याने येथील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका याकडे लक्ष देऊन दुरुस्ती लवकर करावी, अशी आशा आहे.
-एक वाचक, वाकड
PNE25V70821

पदपथाची तातडीने दुरुस्ती व्हावी
रावेत येथील सेक्टर ३२ येथील डॉ. आंबेडकर चौक, नॅशनल सायकल मार्टजवळील पदपथाची अतिशय दुरावस्था झाली आहे. जवळच असलेल्या ॲक्सिस बँक येथील पदापथावरील पेव्हर्स ब्लॉक गायब झाले आहेत. पदपथावरील पेव्हर्सवर खाली झाल्यामुळे रस्ता क्रॉस करत असताना नागरिक अडखळून पडत आहेत. महानगरपालिकेच्या पथ विभागाने या पदपथाची तातडीने दुरुस्ती करावी.
- विलास खरे, रावेत

PNE25V70803

पदपथावर वाहनांचे अनधिकृत पार्किंग
विशालनगर-पिंपळे निलख येथील पदपथालगत वाहन पार्किंग व्यवस्था केलेली आहे. मात्र, नागरिकांनी फूटपाथवर अवैधरित्या वाहने उभी केली जात आहेत. ज्या दुकान आणि हॉटेल्समध्ये जास्तीत जास्त वाहने फूटपाथवर पार्क केली जातात. ती अशीच ठेवावीत. रस्त्यावरील साउंडट्रॅक कॅफेने हे राबवले आहे.
- गोविंद गायकवाड, पिंपळे निलख
PNE25V70822

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT