पिंपरी-चिंचवड

मोरवाडीत वाहनांच्या रांगा, बेशिस्तांमुळे भर

CD

पिंपरी, ता. २५ : मोरवाडी-अहिल्यादेवी होळकर चौकातील एका वस्त्र दालनासमोर वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. येथे येणारे ग्राहक बेशिस्तपणे वाहने उभी करत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यावर गर्दी झाल्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने चालणेही कठीण झाले आहे. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.

या चौकात नियोजनाशिवाय सुरू असलेल्या विविध कामांमुळे रस्ते अरुंद झाले आहेत. नागरिकांना रोजच्या प्रवासात मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या वाहतूक कोंडीला संबंधित वस्त्रदालन व्यवस्थापन कारणीभूत ठरत असल्याचा आरोप वाहनचालक करत आहेत. या दुकानात येणारे ग्राहक आपली दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्यावरच उभी करतात. यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो. वाहतूक पोलिसांनी या वस्त्र दालनाच्या व्यवस्थापकांना तीन ते चार वेळा नोटीस बजावली आहे. तरीही त्यांनी योग्य उपाययोजना केल्या नाहीत, अशी माहिती समोर आली आहे.

मोरवाडी चौकातील रस्ते आधीच अरुंद झाले आहेत. इतर रस्त्यांवरील पदपथांचे रुंदीकरण आधीच झाले आहे. ज्यामुळे वाहनांना पुढे जाण्यासाठी जागा मिळत नाही. वाहने रस्‍त्यावर थांबल्यामुळे चालता येत नाही.
- मंगेश चिंचकर, मोरवाडी

स्मार्ट सिटीचे काम सुरू करण्यापूर्वी वाहतूक विभागाशी समन्वय साधला गेला नाही का? या नियोजनाअभावी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या दुकानावर कायदेशीर कारवाई होणे अपेक्षित आहे. त्याशिवाय सुधारणा होणार नाही.
- अरविंद देशपांडे, म्हाडा कॉलनी

मोरवाडी कोर्टाच्या बाजूनेही पदपथ रुंदीकरणाचे काम सुरू झाल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. या कामामुळे चौकातील अर्धा रस्ता बंद झाला आहे, नागरिक प्रशासनाकडून तत्काळ ठोस उपाययोजना कराव्यात. कोंडीत भर टाकणाऱ्या दुकानावर वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी.
- बंडू चौधरी, मोरवाडी

मोरवाडी परिसरात वाहने दररोज उचलण्यात येत आहेत. तरी सायंकाळी गर्दी करणाऱ्या बेशिस्त वाहनांवर कारवाई करण्यात येईल.
- वर्षाराणी पाटील, वाहतूक

PNE25V70850

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: ''24 तासांमध्ये अजित पवारांचा राजीनामा घ्या नाहीतर अमित शाहांच्या दारात बसणार'', अंजली दमानियांचा इशारा

Ind Vs SA 2nd Test : भारताच्या पराभवानंतर विराट कोहलीचा भाऊ गौतम गंभीरवर संतापला; म्हणाला, दादागिरी दाखवली की हेच होतं...

Nitesh Rane : 'ये अंदर की बात है, दीपकभाई हमारे साथ है!' नीतेश राणेंचा सनसनाटी दावा, छुप्या पाठिंब्यामुळे चर्चांना उधाण?

Bird Election 2025 : शहर पक्षी निवडणुकीवर स्थलांतरित पक्ष्यांची नजर; बॅलेटसह डिजिटल प्रचारावर भर, कुठं सुरु आहे निवडणूक?

Video : "माझं तुमच्यावर प्रेम आहे" ईश्वरीने अर्णवला दिली प्रेमाची कबुली; प्रोमो पाहून प्रेक्षक खुश

SCROLL FOR NEXT