पिंपरी-चिंचवड

कुष्ठरोग शोध अभियानात चौघांचे निदान

CD

पिंपरी, ता. २४ : कुष्ठरोगाचे लवकर निदान झाले तर उपचार परिणामकारक ठरतात. हे लक्षात घेता पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे ‘कुष्ठरोग शोध अभियान’ राबविण्यात येत आहे. यात शहरात आतापर्यंत ३७ हजार ६४५ घरांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १८७ संशयित आढळले आहेत. यातील ९१ जणांच्या तपासण्या पूर्ण झालेल्या असून यापैकी चौघांना कुष्ठरोग निष्पन्न झाला आहे.

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार यंदाही १७ नोव्हेंबर ते दोन डिसेंबरपर्यंत राज्यभर कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येत आहे. लवकर निदान, योग्य उपचार आणि समाजातील भीती दूर करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. महापालिकेच्या वैद्यकीय पथकांत आशा स्वयंसेविका आणि प्रशिक्षित स्वयंसेवक सलग चौदा दिवस हे सर्वेक्षण करणार आहेत. यात गृहभेटी देऊन त्वचेवरील चट्टे, सुन्नपणा, नसांमध्ये सूज आणि संवेदना कमी होणे यांसारख्या संभाव्य लक्षणांची प्रत्यक्ष तपासणी केली जात आहे. संशयास्पद रुग्णांची तातडीने तपासणी करून उपचारासाठी पाठविण्यात येत आहे.

कुष्ठरोगाचे लवकर निदान होऊन रुग्णांवर तत्काळ उपचार केले जावेत यासाठी राज्य सरकारने राबविलेल्या या मोहिमेत महापालिकाही सहभागी झालेली आहे. घरी आलेल्या वैद्यकीय विभाग कर्मचारी तसेच आशा स्वयंसेविका यांना नागरिकांनी सहकार्य करावे.
- डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Philippines Ferry Accident : टायटॅनिक सारखी भीषण दुर्घटना ! ३५० प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाले, १८ जणांचे मृतदेह हाती

प्रजासत्ताक दिन 2026 विशेष: ‘बॅटल ऑफ गलवान’मधील ‘मातृभूमी’पासून सदाबहार देशप्रेम जागवणारी गीते

Horoscope : 26 जानेवारीनंतर धनयोग सुरू! 'या' 4 राशीच्या लोकांची लॉटरी; अचानक येतील पैसे अन् प्रेमात यश, ऐकायला मिळेल मोठी खुशखबर

India EU FTA : खुशखबर ! कार्सच्या किमती आणखी कमी होणार; भारताच्या 'या' डील नंतर कार खरेदी करणाऱ्यांची होणार चांदी

प्रेमाच्या रेशमी धाग्यात गुंफली अभि–कृतिकाची केमिस्ट्री! ‘लग्नाचा शॉट’मधील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT