पिंपरी-चिंचवड

यशवंत-वेणू पुरस्कार सोहळा उद्या होणार

CD

पिंपरी, ता. २५ ः यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या पिंपरी चिंचवड विभागातर्फे देण्यात येणारा ‘यशवंत-वेणू सन्मान’ लातूरचे माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा या दाम्पत्याला प्रदान करण्यात येणार आहे. चिंचवडमधील ऑटोक्लस्टर सभागृहात गुरुवारी (ता.२७) या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येईल. डॉ. पंडित विद्यासागर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह सुनीताराजे पवार यावेळी उपस्थिती असतील. याच कार्यक्रमात विशाल पलांडे (यशवंतराव चव्हाण युवा उद्योजक पुरस्कार), ज्येष्ठ साहित्यिक नंदकुमार मुरडे (यशवंतराव चव्हाण सह्याद्री भला माणूस पुरस्कार) यांना सन्मानित करण्यात येईल. याप्रसंगी श्रमश्री बाजीराव सातपुते यांचे ''यशवंतराव इतिहासाचं एक सोनेरी पान'' या विषयावर व्याख्यान होईल. या सोहळ्याचा सर्व नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन विभागाचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी केले आहे.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: महिला प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलमध्ये ‘पिंक कोच’ सुरू होणार; सुरक्षित प्रवासासाठी नवा उपक्रम

Beed Crime: परळीत अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; दोन नराधमांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Gas Cylinder Issue : ना आंघोळ, ना जेवण, गॅस साठी वणवण; गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांनी गाठले पोलीस ठाणे

Latest Marathi News Live Update : कुस्ती महासंघाच्या विरोधात ISWAI ची पुणे कोर्टात धाव

महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक पूर्ण; पहिला ड्रोन व्हिडिओ आला समोर, उद्घाटनाची तारीख काय?

SCROLL FOR NEXT