पिंपरी-चिंचवड

कचरा व्यवस्थापनासाठी सोसायट्यांना प्रोत्साहन

CD

पिंपरी, ता. २५ ः कचरा व्यवस्थापनासाठी पिंपरी चिंचवड महापालिका सोसायट्यांना प्रोत्साहन देत आहे. रोज १०० किलो किंवा त्याहून जास्त कचरा निर्माण होणाऱ्या सोसायट्यांना कचरा व्यवस्थापनासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाते. अधिकाधिक सोसायट्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
महापालिकेकडून शहरातील कचऱ्याचे पर्यावरणपूरक व्यवस्थापन करण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये ओला आणि सुका कचरा विलगीकरण, होम कम्पोस्टिंग, शून्य कचरा प्रकल्प, वस्तूंच्या पुनर्वापरासाठी ‘आरआरआर केंद्रे’ या उपक्रमांद्वारे नागरिकांमध्ये स्वच्छतेची सवय रुजविण्याचा प्रयत्न सुरू आहे. महापालिकेच्या मदतीने असे पर्यावरणपूरक उपक्रम राबविणाऱ्या सोसायट्या, आस्थापने, हॉटेल व्यावसायिक आणि इतर मालमत्ताधारकांना प्रोत्साहन देण्यासाठी मालमत्ता कर भरताना सामान्यकरात सवलती देण्यात येत आहेत. या उपक्रमामुळे शहरातील अनेक सोसायट्या, शाळा, आस्थापने आणि उद्योगसंस्था कचरा व्यवस्थापनासाठी पुढाकार घेत आहेत. यामुळे शहरातील कचरा संकलनावरील ताण कमी होऊन पर्यावरणपूरक आणि शाश्वत जीवनशैलीकडे वाटचाल सुरू झाली आहे.
---

पालिकेकडून सामान्य करात दिली जाणारी सूट
- ऑन-साइट कम्पोस्टिंग युनिट कार्यान्वित असल्यास ः : ५ टक्के
- ऑन-साईट कम्पोस्टिंग युनिट आणि एसटीपी प्लांट दोन्ही कार्यान्वित असल्यास : ८ टक्के
- फक्त एसटीपी प्लांट कार्यान्वित असल्यास : ३ टक्के
- शून्य कचरा संकल्पना राबविल्यास : ८ टक्के
- शून्य कचरा प्रकल्प व एसटीपी कार्यान्वित असल्यास : १० टक्के सामान्य करात सूट
---
वसुंधरास्नेही शहर घडविण्याच्या दिशेने महापालिका शाश्वत पावले उचलत असून, कचरा व्यवस्थापनात नागरिक आणि सोसायट्यांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. स्वतःच्या परिसरात कचऱ्याचे कम्पोस्टिंग करणाऱ्या संस्था खरं तर शहराच्या स्वच्छतेच्या खऱ्या भागीदार आहेत. महापालिकेकडून अशा उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन आणि सहकार्य दिले जात आहे.
- डॉ. प्रदीप ठेंगल, उपायुक्त, महापालिका
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav: कसोटीबाबत तळमळ; पण... टी-२० स्पेशालिस्ट सूर्यकुमार यादवचे पारंपरिक क्रिकेटबाबत मत

Shri Guru Paduka Darshan Mahotsav : श्रीगुरू पादुका दर्शन महोत्सवाची उत्कंठा,स्वामी स्वरूपानंदांच्या हस्ते शनिवारी उद्‍घाटन, गुरू श्री एम यांचे रविवारी व्याख्यान

Latest Marathi News Live Update : माहिममधील सेंट झेवियर्स कॉलेज बॉम्बने उडवून देण्याची धमकी

नाटक सुरु असताना अस्ताद काळे प्रेक्षकावर का भडकला? नाटक मध्येच थांबवून चांगलंच सुनावलं

IPS Sandeep Karnik : नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, नेमकं प्रकरण काय? २०१९ मध्ये काय घडलं होतं?

SCROLL FOR NEXT