पिंपरी-चिंचवड

संतसाहित्याचा समावेश सर्व शिक्षण पद्धतीत हवा

CD

पिंपरी, ता. २५ : ‘‘भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव २०४७मध्ये साजरा होणार आहे. तोपर्यंत देशाची विश्ववंदित राष्ट्र अशी प्रतिमा उभारली पाहिजे. त्यासाठी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सर्व शिक्षण पद्धतीत संतसाहित्याचा समावेश करणे गरजेचे आहे,’’ असे विचार शिवथर घळ येथील श्री सुंदर मठ सेवा समितीचे विश्वस्त डॉ. विजय लाड यांनी व्यक्त केले.
निगडी-प्राधिकरण येथील ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या मनोहर सभागृहात मातृमंदिर विश्वस्त संस्था आयोजित संत साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष नितीन कारिआ, कार्यवाह डॉ. मनोज देवळेकर, उपाध्यक्षा शारदा चोरडिया, उपक्रम संयोजक सुधीर कुलकर्णी, सुभाष देशपांडे उपस्थित होते.
समीक्षक राधा गोडबोले आणि डॉ. रजनी पत्की यांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन अभिलेखा शिंदे यांनी केले.

ग्रंथ आणि लेखकांचा सन्मान
चिंतनपर आणि विवेचनपर पुस्तकांच्या गटामध्ये डॉ. कल्पना काशीद, डॉ विश्वास मोरे यांच्या ‘पाऊले तुकोबांची’ ग्रंथ प्रथम, रोहन उपळेकर यांच्या ‘विदारूनी महास्तंभ देव प्रकट स्वयंम’ या ग्रंथास द्वितीय डॉ. के. वा आपटे यांच्या ‘आद्य शंकराचार्य कृत सर्व वेदांत सिद्धांत सार संग्रह’ या आणि डॉ. नारायण रघुनाथ देशपांडे यांच्या ‘पूर्णकळा’ ग्रंथाने तृतीय क्रमांक पटकाविला. विशेष पुरस्कार डॉ. श्यामा घोणसे यांच्या ‘क्रांतदर्शी महात्मा बसवेश्वर’ या ग्रंथ तसेच विश्वनाथ छत्रे यांच्या ‘श्री गणेशोत्सव गीतसार’ या ग्रंथास विभागून बक्षीस दिले. संत जीवन आणि ललित साहित्य गटात डॉ. के. वा. आपटे यांच्या ‘षष्ठ पंचशीका’ या ग्रंथास प्रथम, डॉ. सुनीती सहस्रबुद्धे यांच्या ‘सार्थ श्रीराम गीता’ या ग्रंथास द्वितीय क्रमांक मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! एप्रिलमध्ये ‘या’ महिलांनाच मिळणार ३००० रुपये, ‘ई-केवायसी’ न केलेल्या महिलांचा बंद होणार लाभ, वाचा...

उज्ज्वला योजनेच्या महिलांच्या डोळ्यात धूर! ऑनलाइन बुकिंगसाठी ४५ दिवसांची अट; अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय, पण अंमलबजावणी कागदावरच, वाचा...

Paneer Jowar Paratha: उन्हाळ्यात हलका पण पौष्टिक नाश्ता हवा असेल तर घरच्या घरी बनवा स्वादिष्ट पनीर ज्वारी पराठा

अग्रलेख : भारत- चीन व्यापाराचा नवा अध्याय

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १४ मार्च २०२६ ते २० मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT